कोथळी येथे बंद घर फोडून कपाटातील ४ लाख ८३ हजार सोन्या चांदीचे दागिने केले लंपास

0

मुक्ताईनगर/ पंकज तायडे

तालुक्यातील कोथळी येथील रहिवासी असलेले वरणगाव फॅक्टरीत नोकरीला असलेले विनोद धोंडू शिंदे वय ३४ हे कुटुंबासह दिवाळी निमित्त घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. याचाच फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, टाटा स्काय कंपनीचा सेटटॉप बॉक्स आणि ९० हजार रुपयांची रोकड असा एकूण ४ लाख ८३ हजार १७० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विनोद शिंदे यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परविन तडवी करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!