पुसद -/तालुक्यातील जिप सर्कल मधील खामलवाडी येथील कर्जबाजारीपणामुळे त्रस्त देविदास हरी राठोड या अल्पभूधारक शेतकऱ्यांने २३नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली होती. दोन दिवसांपूर्वी पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी पीडित परिवाराची सांत्वन पर भेट घेवून मदतीचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची अवघ्या २४तासात पूर्तता करीत काल पीडित परिवाराला भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत ५०हजार रु ची मदतीचा धनादेश दिला. तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचे शरद मैंद यांनी सांगितले.यावेळी उपस्थित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ता मनीष जाधव यांनी दुःखी पीडितांच्या अश्रूला पुसणारे शरद मैंद यांच्या सारखे समाजातील निःस्वार्थ हात समोर येणे गरजेचे आहे असे मत व्यक्त करीत प्रतिक्रियावादी न राहता त्यांनी कृतीतून मदत केली असे समाजात अपवादत्मक उदाहरणं असल्याचे आवर्जून सांगितले. शरद मैंद यांनी सामाजिक बांधिलकी जपून केलेल्या मदतीचा आदर्श इतर नेत्यांनी घेऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ राहावे असे आवाहन केले. यावेळी सर्व गावाने शरद मैंद यांचे आभार व्यक्त केले हे विशेष.यावेळी मृतक देविदास राठोड यांची पत्नी मायाताई, वडील हरी राठोड, आई यशोदा, मुले यश व महेश राठोड विधवा बहीण सविता तसेच सरपंच गजानन चव्हाण,पोलीस पाटील शंकर पवार, संजय राठोड, विष्णू राठोड, दिलीप नाईक, आकाश राठोड, भावराव आडे, राजुसिंग चव्हाण, विजय चव्हाण, उमेश चव्हाण, नामदेव चव्हाण, गोपाल जाधव, प्रल्हाद जाधव, रामराव राठोड,देविदास राठोड, शामराव राठोड, श्रीराम राठोड, गजानन आडे, विजय चव्हाण, गजानन चव्हाण, रोहिदास राठोड, विष्णू आडे, संदेश रणवीर तसेच खामलवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.