खैरलांजीची पुनरावृत्ती टळली; भाजपा जिल्हा सचिव चमडीचोर लुच्छा सतीश मानलवारच्या ५४ जणांच्या गुंड टोळीचा दलित डोफे कुटुंबावर प्राणघातक हल्ला!

0

🔥हाच तो यवतमाळ जिल्हा भाजपा सचिव सतीश उर्फ लुच्चा मानलवार या चमडीचोर ने दलित समजा चे घरावर केला जीवेघेने हमला याचे वर अनुसूचित जनजाती च्या कलमानवये गुन्हा दाखल करण्याची मागणी

🔥खैरलांजीची पुनरावृत्ती टळली; भाजपा जिल्हा सचिव चमडीचोर लुच्छा सतीश मानलवारच्या ५४ जणांच्या गुंड टोळीचा दलित डोफे कुटुंबावर प्राणघातक हल्ला!

🔥दलित कुटुंबावर रक्ताळलेला हल्ला चढवणारा भाजपा सचिव सतीश मानलवार पोलिसांच्या संरक्षणात मोकाट; मंत्र्यांच्या वरदहस्ताने कारवाई थंडावली?

​​बाभुळगाव -/ सत्तेचा माज आणि जातीय विद्वेषाचे अत्यंत किळसवाणे, हिंस्त्र रूप पुन्हा एकदा बाभुळगाव तालुक्यातील कृष्णापूर येथे उघडकीस आले आहे. भाजपचा जिल्हा सचिव चमडीचोर लुच्छा सतीश नारायण मानलवार याने आपल्या तब्बल ५४ जणांच्या गुंड टोळीसह गावातील निरपराध दलित डोफे कुटुंबावर सशस्त्र प्राणघातक हल्ला चढवून खैरलांजी हत्याकांडाची पुनरावृत्ती करण्याचा भीषण कट रचला. या अमानुष हल्ल्यात डोफे कुटुंब सुदैवाने बालबाल बचावले असले तरी गावात भयावह दहशतीचे सावट पसरले आहे. इतकी गंभीर घटना घडून आणि बाभुळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही मुख्य सूत्रधार सतीश मानलवार व त्याचे साथीदार पोलिसांच्या नाकावर टिच्चून मोकाट फिरत असल्याने जनतेत तीव्र संताप उसळला आहे.

बाभुळगाव तालुक्यात शांतता आणि सामाजिक सलोख्याला सुरूंग लावत सत्तेच्या उन्मादात वावरणाऱ्या भाजप जिल्हा सचिव सतीश मानलवार याच्या क्रूर प्रवृत्तीने सीमा गाठली आहे. कृष्णापूर येथील रहिवासी असलेल्या दलित डोफे कुटुंबाला लक्ष्य करत मानलवारने गावात पद्धतशीरपणे जातीय तेढ निर्माण केली. गावकऱ्यांना आणि आपल्या गुंड टोळीला चिथावणी देऊन मानलवारने ५४ जणांच्या सशस्त्र जमावासह डोफे यांच्या घरावर अचानक प्राणघातक हल्ला चढविला. घरात घुसून अमानुष मारहाण, तोडफोड आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच थरकाप उडाला. या रानटी हल्ल्यात डोफे कुटुंबातील सदस्य गंभीर जखमी झाले असून ते केवळ दैवबलवत्तर म्हणून या जीवघेण्या प्रसंगातून बालबाल बचावले आहेत. जर ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवले नसते, तर कृष्णापुरात महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या दुसऱ्या खैरलांजीची नोंद झाली असती.

या भयंकर घटनेनंतर बाभुळगाव पोलीस ठाण्यात सतीश मानलवार आणि त्याच्या गुंड टोळीविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर ज्या तत्परतेने आरोपींच्या मुसक्या आवळणे गरजेचे होते, तिथे बाभुळगाव पोलिसांनी संशयास्पद आणि लाजीरवाणे मौन बाळगले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्याच्यावर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंदवला गेला आहे, तो मुख्य सूत्रधार चमडीचोर लुच्छा सतीश मानलवार आणि त्याचे गुंड उजळ माथ्याने थेट पोलीस ठाण्याच्या आवारात बिनधास्तपणे वावरताना दिसत आहेत. तक्रारदार डोफे कुटुंब दहशतीखाली जगत असताना, आरोपी मात्र पोलिसांसमोरच शड्डू ठोकत असल्यामुळे पीडितांना न्याय कसा मिळणार, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणावर दलितांवर हल्ला होऊनही पोलीस यंत्रणा नेमकी कोणाच्या दबावाखाली हात बांधून बसली आहे, याचे उत्तर आता राजकीय वर्तुळात उघडपणे चर्चिले जात आहे. राज्याच्या आदिवासी विकास मंत्र्यांचा या संपूर्ण प्रकरणाला थेट वरदहस्त असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘तुम्ही घाबरू नका, मी आहे, सगळं पाहून घेईन,’ असा उघड राजकीय पाठिंबा आणि अभय या गुंडांना देण्यात आला आहे. एका बाजूला संविधानाची शपथ घेऊन सत्तेवर बसायचे आणि दुसऱ्या बाजूला गुंड प्रवृत्तीच्या पदाधिकाऱ्यांना पाठीशी घालून पीडित दलितांच्या जखमांवर मीठ चोळायचे, हा घाणेरडा राजकीय खेळ सध्या सुरू असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. मंत्र्यांच्या या हस्तक्षेपाने बाभुळगाव पोलिसांची लाचारी चव्हाट्यावर आणली आहे.

समाजातील शांतता धोक्यात आणणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या गुन्हेगारांना तातडीने गजाआड करण्याची प्राथमिक जबाबदारी यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची आहे. परंतु, इतके गंभीर प्रकरण घडल्यानंतरही पोलीस अधीक्षकांकडून दाखवला जाणारा वेळकाढूपणा अत्यंत संशयास्पद आणि निषेधार्ह ठरत आहे. गुन्हा दाखल होऊन तासनतास उलटूनही मुख्य सूत्रधार मोकाट का? त्याला अटक करण्यासाठी विशेष पथके का रवाना झाली नाहीत? या प्रश्नांवर पोलीस प्रशासन पूर्णपणे निरूत्तर आहे. ‘न्याय मागायला येणाऱ्या दुर्बलांना वाऱ्यावर सोडायचे आणि सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचायचे’ हाच काय तो पोलिसांचा खाक्या, असा तीव्र संताप सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.

आरोपी सतीश मानलवार हा केवळ एका पक्षाचा पदाधिकारी नसून तो समाजासाठी घातक ठरणारी गुंड प्रवृत्ती आहे. अशा समाजकंटकाला राजकीय संरक्षणाच्या जोरावर मोकळे सोडणे म्हणजे कायद्याच्या राज्याचा खून करण्यासारखे आहे. बाभुळगाव पोलीस आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने तात्काळ सतीश मानलवार याच्यासह त्या ५४ जणांच्या गुंड टोळीला बेड्या ठोकल्या नाहीत, तर संपूर्ण जिल्ह्यात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा विविध सामाजिक आणि आंबेडकरी संघटनांनी दिला आहे. डोफे कुटुंबाला पोलीस संरक्षण देऊन या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अन्यथा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला आहे.

कुख्यात गावगुंड सतिष मानलवार टोळीतील 54 आरोपींनी संघटीतपणे दलीत कुटूबीयांवर हल्ला केला होता यामध्ये आरोपी 1 प्रमोद यशंवत गेडेकर 2 सौ. निमला रमेश जुनगरे

3 अरविंद शवंत गेडेकर 4 दिनेश प्रभाकर कामडे 5सुरेश रमेश जुनघरे 6 योगेश दिलीप डाखोरे 7 सागर गोपाल ठाकरे 8 मयुर अरविंद गेडेकर 9 सुजल प्रमोद गेडेकर 10 मोरेश्वर भाऊराव भुजाडे 11 आनंदराव महादेव भोयर

12 प्रमोद आनंदराव भोयर 13 रितेश राजेंद्र कामडे 14 सचिन मोरेश्वर भुजाडे 15 मनोज सुधाकर भुजाडे 16 निकेश सुधाकर भुजाडे

नरेश रमेश जुनघरे18 राजेद्र मधुकर कामडे

19 दिनेश ज्ञानेश्वर कुरनुले 20 अतुल शंकर चौधरी 21 प्रफुल शंकर चौधरी 22 समय शंकर येडे 23 निखील पुडलिक खेडक 24 नंदु वाजगुरे 25 अंकुश मारोती भुजाडे 26पुंडलिक चंपत खेडकर 27 सौ. सुवर्णा प्रमोद गेडकर

28 सौ. मालु सुधाकर भुजाडे 29 सौ. कल्पना शंकर ठे०डे 30 सौ. संगीता गोपाल 31 ठाकरे सौ. नलु सुरेश जुनघरे 32 सौ. मनिषा नरेश जुनघरे 33 सौ. माधुरी प्रशांत गुरुनुले 34 सौ. स्वाती दिनेश गुरुनुले 35 सौ. पोर्मिमा प्रफुल चौधरी 36 सौ. ज्योस्ना अतुल चौधरी 37

सौ. भारती दिनेश कामडे 38 सौ. मंगला प्रमोद भोयर 39 सौ. प्रभाबाई वामन गुरुनुले 40 सौ. वंदना रमेश देशमुख 41 सौ. कल्पना महेश कामडे 42 सौ. संगीता राजेंद्र कामडे 43 सौ. आशा मनोज भुजाळे 44 सौ. शांता आनंदराव भोयर 45 सौ. वंदना पुंडलिक खेडकर 46 सौ. गुंफा महादेव शिवनकर 47 सौ. संगीता गोपाल ठाकरे 48 सौ. मिना अरविंद हिने 49 भारती दिनेश कांमडे 50 मनिषा नरेश जुनघरे 51 सतिष नारायण मानलवार 52 प्रांजली एस. तालंन 53 सौ मिना अरविंद गेडेकर 54 सुभाष वसंतराव धोटे अशी ही टोळी असुन ही टोळी समाजासाठी घातक ठरत आहे त्यामुळे या टोळीचा जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांनी लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!