आर्णी -/शेताच्या किरकोळ खर्चासाठी शेतकरी नेहमी आपल्या घरी जनावरे पाळतात व अडीअडचणीत गुरे ढोरे विकून किरकोळ अडचण दूर करतो अशातच गुरुवार असल्याने आर्णी शहरात मोठा बेलबाजार भरतो मात्र बाजारात व्यापारी वर्गानी पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यात परिचित असलेला आर्णी येथील बेलबाजार हा मोठ्या प्रमाणात भरतो या बाजारात पर जिल्ह्यातील शेतकरी आपले चांगले दर मिळत असल्याने गुरे ढोरे खरीदी विक्री करिता आणतात व अडीअडचण दूर करतात अशातच तालुक्यातील सर्व व्यापाऱ्यांनी जनावरे खरीदी विक्रीवर बहिष्कार टाकल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.गोवंश हत्या बंदीचा कायदा असल्याने वेळोवेळी गोवंश कारवाया पहावयास मिळते.सोबतच बजरंग दल या संघटनेकडून व्यापाऱ्यासह शेतकऱ्याच्या वाहनाला अडवून नाहक त्रास दिला जात असल्याने व्यपारी वर्गाने जनावरे खरीदी विक्री करण्यावर बहिष्कार टाकल्याचे व्यापारी वर्गातून बोलल्या जाते.दुसरीकडे शेतकरी हा आपला शेतीसाठी किरकोळ खर्च जनावरे विकून करतो खेड्यापाड्यातुन मिळेल त्या वाहनातून घरची गुरेढोरे बाजारात विक्री करिता आणतात मात्र त्यांनाही मोठया अडचणीचा सामना करावा लागतो अशातच शेतीचा किरकोळ खर्च नेमका कसा करावा असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.
घरात काही सुख दुःख आले तर घरच धन म्हणून पूर्वीपासून घरातील जनांवराकडे पाहिले जाते.घरातील जनावरे विकून किरकोळ खर्च भागविला जातो.मात्र व्यापारी वर्गाने जनावरे खरीदी विक्री बंद केल्याने नेमकं आता आम्ही कोणाला जनावरे विकावी शासनाने किव्हा बजरंग दलाने जनावरे विकत घ्यावी व आमच्या अडीअडचणी दूर कराव्या
पंकज गठलेवार शेतकरी आर्णी
शेताच्या मालाला खत,युरिया,फवारणीसह मजुरांचा खर्च हा घरातील जनावरे विकून भागवित असतो सकाळी तीन ते चार तासापासून मी बेलबाजारात दोन बेलाना विक्री करिता आणले मात्र विकत घेणारे कोनीच नसल्याने शेतीचा खर्च कोठून करावा
विनोद कवडे शेतकरी पुसद
दोन पैसे मजुरी मिळावी म्हणून खेड्यापाड्यातुन जनावरे आणून बेल बाजारात आणून शेतकऱ्यांना विक्री करतो ग्रामिण भागातून जनावरे मिळेल त्या मालवाहू वाहनातून आणतांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागतो रस्त्याने येतांना कुठेही बजरंगदलचे कार्यकर्ते वाहने अडवून दमदाटी करतात पोलीस स्टेशनला वाहने लावून गुन्हे दाखल करत असल्याने आर्थिक व मानसिक नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने जनावरांची खरीदी विक्री बंद केली आहे. रियाज शेख व्यापारी आर्णी