घरकुल रेतीधारकांचा रेती ट्रॅक्टरचा मौत का तमाशा याला जबाबदार कोण तहसीलदार की वरिष्ठ अधिकारी

0

🔥घरकुल रेतीधारकांचा रेती ट्रॅक्टरचा मौत का तमाशा याला जबाबदार कोण तहसीलदार की वरिष्ठ अधिकारी.

हिंगणघाट -/ हिंगणघाट तहसील हद्दीमध्ये कापसी रेती घाट हा घरकुल लाभार्थ्यांना रिझर्व्ह करण्यात आला परंतु या घाटात रेती नसून नुसते पाणी निघत आहे लेबर व घरकुल लाभार्थी स्वतःच्या जीवाचा विचार न करता इथून रेती काढतो परंतु तहसीलदार योगेश शिंदे यांना काही फरक पडत नाही उद्या कोणत्या लेबरचा किंवा घरकुल लाभार्थ्याचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण आज रोजी दिनांक 31 /12/ 2025 ला एक ट्रॅक्टर पलटी होऊन पाण्यात दुबला परंतु कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु जीव जायला वेळ लागत नव्हता हिंगणघाट तहसील मध्ये भरपूर रेतीचे घाट आहे आणि रेती साठा पण भरपूर उपलब्ध असताना सुद्धा कापसी रेती घाट का रिजर्व करण्यात आला याच्या मागचे कारण अद्याप समजले नाही जिथे वाळू साठा उपलब्ध आहे तो घाट रेती माफी यांना उपलब्ध करून तर दिला नाही ना तहसीलदार साहेबांनी असा प्रश्न आता नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे

तृषार खूणकर सहसीक News-/24 वर्धा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!