घरातून काढलेल्या वृद्धांनी धरला स्मशानभूमीचा रस्ता
Byसाहसिक न्यूज24
प्रतिनिधी/ वर्धा : घरातील वादात मुलाने घरून हाकलून दिलेल्या माता-पित्यानी समाशंभूमीकडे जाण्याची भूमिका घेतली. स्मशानभूमी जवळ दिसलेल्या वृद्धांना पाहून अखेर पोलिसांच्या मदतीने स्थानिकांनी पुन्हा आपल्या मुलांकडे सुपूर्त केले. यावेळी मुलाला समज देखील दिल्याची माहिती आहे.
समता नगर येथील महादेव कोंडीबा अलाट (85) आणि पत्नी मंजुषा महादेव अलाट (65) यांचा वृद्धापकाळामुळे मुले सांभाळ करीत नसल्याची परिस्थिती आहे. लहान मुलाने सांभाळण्यास नकार दिल्याने मोठ्याची आई वडिलांनी धारली. पण तेथे देखील निराशाच हाती आली. मुलाचा आई वडिलांसोबत होणारा वाद नकोसा झाला आणि आई वडिलांनी बाहेरची वाट पकडली. मुलाने थांबविण्याऐवजी त्यांना बाहेरचाच रस्ता दाखविला गेला. दोन मुलं आणि दोन मुली असणाऱ्या या दाम्पत्याने अखेर परिसरात असलेल्या स्मशानभूमी कडे जाण्याचा पर्याय निवडला. स्मशान भूमीजवळ बसून दिसलेल्या वृद्धांना पाहून मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि युवकांच्या सहकार्याने पुन्हा आपल्या मुलांकडे दोघाना सोडण्यात आले. मुलांना समज देखील देण्यात आली आहे.