जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पदभार स्विकारला
Byसाहसिक न्यूज24
प्रतिनिधी/ वर्धा:
वर्धाचे जिल्हाधिकारी म्हणून राहुल कर्डिले यांनी मावळत्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडून आज पदभार स्विकारला.
मावळत्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी श्री.कर्डिले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नवे जिल्हाधिकारी 2015 च्या तुकडीचे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी आहे. येथे रुजू होण्यापूर्वी ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई येथे सह आयुक्त या पदावर कार्यरत होते. त्यापूर्वी चंद्रपूर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. पदभार स्विकारल्या नंतर विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना भेटून त्यांचे स्वागत केले.