जिल्ह्यात दारूबंदी असताना देवळीतिल अमर तांडेकर रेस्टोरेंटच्या नावाखाली करतो विदेशी दारुचि थेट विक्री: सांगतो पोलिस माझ्या खिशात.

देवळी/प्रतीनिधी:
देवळी शहारालगत सरकारी दवाखान्याच्या अगदी समोरचं दारू विक्रेते अमर तांडेकर यांनी टिनाचे शेड उभारून बारचं उघडल्याचे दिसून येते. तांडेकर साहेब आपल्या रेस्टोरेंट मधून मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूचा अवैध व्यवसाय आपल्या रेस्टोरेंट मध्येच ग्राहकांना बसवून चालवितो. सदर दारू विक्रेत्यांकडून पोलिसांना लाखोची हप्ता वसूली जात असल्याची चर्चा काही प्रामाणिक पोलिसांसह सर्वत्र पसरल्याचे दिसते. या सगळा मॅनेजिंग व्यवस्थेमुळे मद्यपींना हे रेस्टोरेंट बारचं असल्याचे वाटते.
तिथे मद्यपिंसाठी टेबल खुर्च्याही टाकल्या व बारच्या थाटातली व्यवस्था केली. देवळी पोलिस स्टेशन च्या पोलिसांसोबत मधुर संबंध असल्याने तांडेकर भाऊ ची दुकानदारी अनेक दिवसांपासून बिनधास्त सुरू आहे. आणि यातही महत्वाचे म्हणजे पोलिस निरीक्षक साहेबांनासुद्धा याची कल्पना नाही का ? पण पोलिस सुद्धा काय करणार! अश्या शांततामय व्यावसायिक वातावरणात आडकाठी आणण्याचे काम पोलिसांचे नाही ? ते अवैध असो की वैध हेही ठरविण्याचे अधिकार पोलिसांना नाही.
या दारूच्या अवैध धंद्यावर आता चक्क पोलिस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त व राजस्व विभागचं कार्यवाही करणार तेही पोलिस निरीक्षक राणे साहेबच्या परवानगी शिवाय, पण कार्यवाहिपासून पोलिस निरीक्षक साहेब नाराज होण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा देवळी करांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे.