दहा वर्षापासुन पाहिजे असलेला आरोपी सेवाग्राम पोलीसाच्या जाळ्यात

0

क्राईम प्रतिनिधी / वर्धा :

सेवाग्राम पोलीस स्टेशन येथ कलम 420,395 भादवी चा गुन्हा नोंद असुन सदर गुन्हयात एकुन 12 आरोपी असुन त्यापैकी काही आरोपीना अटक करुन प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले होते, परंतु गुन्ह्यातील आरोपी जनार्धन बापूराव जाधव वय 42 वर्ष, रा उमरी (कोरा) वर्धा हा गुन्हा नोंद झाल्यापासुन आज पर्यंत आपल्या मुळ गावी न राहता ईतरञ राहुन काम काज करित होता.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीती नुसार आरोपी हा बारमती येथे राहत असल्याची माहीती सेवाग्राम गुन्हे प्रकटीकरण पथकास प्राप्त झाल्याने तात्काळ बारामती येथे रवाना होवुन आरोपीस ताब्यात घेवुन आरोपीस न्यायालयाचे स्वाधीन करण्यात आले.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पियुश जगताप, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ब्राम्हणे याचे निर्देशाप्रमाणे पो. हवा. हरिदास काकड, नापोशि. गजानन कठाणे, जयेश डांगे, पोशि पवन झाडे अभय ईगळे सर्व नेमणुक पोलीस स्टेशन सेवाग्राम तसेच सायबर सेल चे निलेश कट्टोजवार यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!