देवळीत पोलिसांचा रूटमार्च….
देवळी : शहरातील पोलीस विभाग व होमगार्ड सैनिक यांच्यावतीने देवळी येथे रूटमार्च काढण्यात आला.श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्य शहरात चोक बंदोबस्त ठेवण्याच्या दृष्टिकोनातून रूट मार्च काढण्यात आला.पोलीस स्टेशन येथून सुरू झालेला रूट मार्च देवळीतील आठवडी बाजार,पोलीस स्टेशन,इंदिरा गांधी, चौक,ठाकरे पुतळा,आंबेडकर नगर,व शहरातील इतर रस्त्यांनी फिरवून पोलीस स्टेशन मध्ये रूट मार्च समारोप करण्यात आला.या रूट मार्च चे नेतृत्व ठाणेदार भानुदास पिदुरकर यांनी केले रूट मार्च मध्ये उपपोलीस निरीक्षक सुमित कांबळे,तसेच पोलीस हवालदार,पोलीस शिपाई,होमगार्ड सैनिक राजेंद्र नवथरकर, व अन्य पोलीस विभागाचा सहभाग होता. देवळी शहरांमध्ये संपूर्ण शांतता असून राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्य शहरामध्ये उत्साहाचे वातावरण असून देवळी शहर भगवामय झाले असून रोशनाईने पूर्णपणे सजविण्यात आले असून सर्वधर्मीय लोकांकडून या कार्यक्रमात सहकार्य आहेत. 
सागर झोरे साहसिक न्यूज/24 देवळी