देवळी तालुक्यातील नागझरी गावातील अवैध गावठी दारू व देशी विदेशी विक्रेत्यांचा सुळसुळाट

0

🔥हेच ते देवळी तालुक्यातील नागझरी गावातील अवैध गावठी दारू व देशी विदेशी विक्रेत्यांचा सुळसुळाट🔥उत्पादक शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाचे यावरती मात्र दुर्लक्ष

देवळी -/ शासनाकडून अवैध गावठी व देशी विदेशी दारू बाळगणाऱ्या विरोधात कायदे बनविण्यात आले आहे.मात्र हे कायदे नुसतं कागदावरच दिसत आहे,कारण देवळी तालुक्यातील सात की.मी असलेल्या नागझरी या गावातील खुलेआम गावठी व देशी विदेशी दारू विक्री जोमात सुरू आहे.

या गावठी दारू सह विदेशी देशी सेवन करणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अल्पवयीन शाळेकरी विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असून कुटुंब ही उध्वस्त झाली आहे. 

              देवळी तालुक्यातील नागझरी गावातील काही ठिकाणी घरातील थंड्या पाण्याच्या जलप्राय सोबत नागझरी गावातील अड्डे बनविले आहे.त्यामुळे पुलगाव पोलिसांची गुप्त यंत्रणा पूर्णतः कोलमडलेल्या सारखी दिसत आहे.तालुक्याच्या नागझरी गावातील सुरू असलेली खुलेआम अवैध गावठी व देशी विदेशी दारू,जोरात सुरु असून माहिती कदाचित पुलगाव पोलिसांना नसावी त्या कारणांनी नागझरी गावातील गावठी व देशी विदेशी दारू विक्रीचे जाडे(रॅकेट)पसरले आहे.तरी अश्या या अवैध गावठी दारू सह देशी विदेशी दारू विक्रेत्यांवर आता काय कारवाई, व कधी होणार?यावरती नागझरी गावातील नागरिकांचे लक्ष लागले आहेत.(क्रमशः)

सागर झोरे साहसिक News-/24 देवळी वर्धा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!