देवळी पिंपळगाव बस पडते नेहमी बंद, पण प्रवासी आहे त्रस्त.
देवळी : वरून पिंपळगाव ला जाणारी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची एसटी बस नित्यनियमाने एक-दोन दिवसा आढ रस्त्यात बंद पडत असल्या कारणाने शाळेकरी विद्यार्थी,शेतकरी प्रवासी,शासकीय नोकरीदार वर्ग, या त्रासा पाही त्रस्त झाले आहे.देवळीवरून पिंपळगाव ला जाण्यासाठी ही बस देवळीवरून सकाळी १० वाजता सुटत असून या बस मध्ये शाळेचे विद्यार्थी ग्रामीण भागातील काम करणारे कर्मचारी व काही शेतकरी वर्ग या बसने दररोज जाणे येणे करतात ही बस अडेगाव,चिंचाळा,दापोरी,कोळना चोरे फाटा,या मार्गे पिंपळगाव ला जाते ही बस पुलगाव डेपोची असून अत्यंत भंगार अवस्थेत आहे हीच बस नेहमी या मार्गावर जाने येणे करतात,देवळी वरून ही बस सुटल्यानंतर रस्त्यात कुठेही बंद पडतात पण प्रवाशांना नेण्यासाठी दुसरी बस पाठविण्यात येत नाही बंद पडलेल्या ठिकाणी प्रवाशांना रस्त्यावरच उतरून देण्यात येते कंडक्टर प्रवाशांना कधी टिकीटचे पैसे परत करतात तर कधी करत नाही कोणतेही वाहन नसल्याकारणाने प्रवाशांना पायदळ आपापल्या गावाला जावे लागते यासंदर्भामध्ये अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या पण याची दखल घेण्यात आलेली नाही बस मध्ये प्रवास करणारे लहान लहान विद्यार्थी त्यांना पायी जाणे शक्य नसल्याकारणाने एखाद्या वाहनाची वाट पाहत रस्त्यांवर तासनंतास उभे राहावे लागते. याप्रकरणी देवळी येथील वाहतूक नियंत्रण बस स्टेशन कार्यालयाला याची संपूर्णपणे जाणीव असून यासंदर्भात विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी तक्रारी करून सुद्धा याची दखल घेण्यात आलेली नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन देवळीच्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी. अशी त्रस्त नागरिक मागणी करीत आहे.
सागर झोरे साहसिक न्यूज/24 देवळी