🔥देवळी येथे माजी न.प.उपाध्यक्ष.गयासुद्दीन काजी यांचे निधन.
देवळी -/देवळी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा हजरत दिनाच्या वली मस्जिद ट्रस्टचे माजी अध्यक्ष गयासुदिन काजी यांचे मंगळवारी सकाळी सेवाग्राम रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
एका वर्षापूर्वी त्यांचे दुचाकी दे अपघात झाला होता तेव्हापासून ते आजारी होते. आणि मागील एका वर्षापासून ते उपचार घेत होते सोमवारी त्यांची तब्येत बिघडल्यावर त्यांना सोमवारी त्यांना सेवाग्राम विभागात दाखल करण्यात आले होते. ते अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते त्यांच्या अचानकपणे गेल्याने देवळी शहरात हा व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मागे तीन मुले, एक मुलगा पत्नी, नातू असा परिवार आहे ते माजी नगरसेवक अब्दुल नईम यांचे मामा होते. त्यांचे अंतिम संस्कार आज ६ जानेवारी रोजी देवळी येथील कब्रस्तानामध्ये केल्या जाणार आहे.