देवळी येथे रणरागिनी मंचाद्वारे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली…

0

🔥देवळी येथे रणरागिनी मंचाद्वारे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.

देवळी -/ येथील रणरागिणी मंचाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सावित्रीबाई फुले तसेच क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवळी चे नवचर्चित न.प.अध्यक्ष किरणजी ठाकरे व त्यांच्या सहचारिणी शिखा ठाकरे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसूर्य जोतिबा फुले यांच्या कार्यावर भाषणे सादर करून स्त्री शिक्षण व समाज सुधारणेतील त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संगीताताई बढे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिपाली महाजन,रूपाली महाजन, प्रिया नंदूरकर, वंदना महाजन, वंदना डोंगरे, पौर्णिमा सुखलकर, दुर्गा भोकरे,माया देशमुख, हर्षा लोंढे, छबूताई लोंढे, माधुरी कुबडे, सोनम चकोले, सुषमा तेलरांधे, संध्या राऊत,वर्षा तेलरांधे, कविता उंबरकर, शीतल बढे, सारिका काटेखाये, अर्चना नासरे इत्यादी महिलांनी सहकार्य केले.

सागर झोरे साहसिक News-/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!