दैव बलवत्तर म्हणूनच लागले मरणाच्या पुलाजवळ ‘ब्रेक’

0

Byसाहसिक न्यूज24
देवळी / सागर झोरे :
25 जानेवारी ला 7 सावंगी (मेघे )मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा अपघात झाला होता,ही घटना सर्वांना अविस्मरणीय आहे.याच ठिकाणी अपघाताची मालिका सुरुच आहे.याच ठिकाणी नागपूर, तुळजापूर मार्गावर देवळी कडून वर्धा कडे जात असतांना सेलसुरा नजीकच्या पुलाजवळ अपघात झाला .हा अपघात 16 ऑगस्ट सकाळी 6:30 वाजताच्या दरम्यान झालेला आहे.
कार क्र.MH 29 BY 2918 यवतमाळ येथून नागपूरकडे जात असताना पुलाच्या संरक्षण भिंतीला जबरदस्त धडक दिली. त्यामध्ये कारचे फार नुकसान झाले असून,कार पुलावरून खाली पडता पडता थोडक्यात बचावली. यात गाडीमधील दोघांना जबरदस्त मार लागून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. वाहनाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रस्त्यात गाडीलाअचानक जंगली जनावर आडवे गेल्याने हा अपघात झाला आहे अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे . पुढील तपास सावंगी पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!