दोन एटीएम फोडून २२ लाखांची रोकड लंपास
साहसिक न्यूज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
वर्ध्याच्या वायगाव आणि बोरगाव येथे आज पहाटेच्या सुमारास एटीमवर दरोडा घालण्यात आल्याची घटना घडली आहे. स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यानी 22 लाखाची रोकड लंपास केली आहे. गॅस कटरच्या साहाय्याने हे एटीएम फोडण्यात आले आहे.
वर्धा – हिंगणघाट मार्गावर असलेल्या वायगाव आणि बोरगाव या दोन्ही ठिकाणी चोरट्यानी एटीएम फोडले आहे. पाहटे तीन वाजता हे एटीएम फोडण्यात आले. एटीएम मध्ये असलेल्या सीसीटीव्ही वर काळ्या रंगाचा स्प्रे मारण्यात आलाय. त्यांनतर चोरट्यानी चोरी किली आहे. तब्बल 22 लाखाची रोकड एटीएम फोडून लंपास करण्यात आली आहे. बोरगाव येथे एटीएम ला गॅस कटर लावले गेले पण त्यात चोरट्यांना यश आले नाही. त्यामुळे ते वायगावला पोहचले. वायगाव येथे गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम तोडण्यात आले. चोरट्यानी 22 लाखाची रोकड काढलीय. मोठ्या गाडीने आलेल्या चोरट्यानी पेट्रोलिंग करणारी पोलिसांची गाडी आल्यावर पळ काढलाय. पोलिसांच्या हातावर तुरी देत चोरटे पसार झाले आहेय. गॅस कटर आणि सिलेंडर हे सोडून चोरटे पसार झाले आहे. सर्वत्र नाकेबंदी करण्यात आली असून चोरटे वर्ध्याच्या आसपासच दडून बसले असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पहाटे दरोडा घालणाऱ्या चोरट्यांचे आता पोलिसांसमोर खुले आव्हान असल्याचेच बोलले जात आहेय.