🔥देवळी तालुक्यातील नागझरी येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या मृतक चेतन जिवणे वय २४ वर्ष.
देवळी -/नागझरी येथील रहिवासी चेतन दिनेश जीवने वय २४ वर्ष यांनी आपल्या स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्राप्त माहितीनुसार नागझरी येथील चेतन जीवने वर्धा येथील शिक्षण घेत होता परंतु शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता च्या दरम्यान त्याच्या परिवारातील लोक शेतकामे आटपून घरी आले असता घराचा दरवाजा वाजविला असता कोणीच उघडत नव्हतं आणि अनेक आवाज दिल्यावर तरी दरवाजा उघडे ना तेव्हा शहरातील लोकांना जमा झाले तेव्हा खिडकीतून बघितले असता चेतन मात्र हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला तेव्हा तत्काळ घटनेची माहिती पुलगाव पोलिसांना देण्यात आली तेव्हा रात्रीच्या अकरा वाजता दरम्यान पुलगाव पोलीस मृतकाचा पंचनामा करण्याकरिता दाखल झाले आणि शवाचा पंचनामा करून पुलगाव येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही. तसेच नागझरी गावातील शोकाकूळ पसरलेला आहे. 🔥पुलगाव पोलिसांनी दिली असभ्य वर्तणूक🔥
सहा ते सातच्या दरम्यान झालेल्या आत्महत्येच्या पंचनामा करण्याकरिता रात्री अकरा वाजता पोलीस तेथे पोहोचले संतप्त झालेल्या लोकांनी जेव्हा त्यांनी प्रश्न विचारले की इतका वेळ का लागला तेव्हा पोलिसांनी उपस्थित असलेल्या माहिती घेत असतांनी पत्रकारांशी बाचाबाची केली आम्हाला एकच काम आहे का उशीर झाला तर काय झालं लवकर आलो असतो तर मेलेला माणूस जिवंत झाला असता का व त्यांच्या वर्तणुकीचा व्हिडिओ बनवीत असलेल्या पत्रकारांचा मोबाईल हिसकून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली.व झालेल्या वागणुकीत तुम्ही कोण पत्रकार आहे की नाही आहेत तेव्हा संपदाकाशी दूरध्वनी वरून बोलणे करून दिले असता त्यांना विचारपूस केली व खोटे वागणूक सांगून माहिती दिली.तरी अशा माज चढलेल्या आपल्या कर्तव्याची परवा न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस अधीक्षकांनी कारवाई करावी अशी मागणी संतप्त झालेल्या नागझरी गावातील लोकांनी केली आहे. याकडे पोलीस अधीक्षक लक्ष देतील का?तसेच पंचनामा करण्यात आलेले पोलीस कर्मी मध्यधुंध असल्याचे गावातील नागरिकांचा सांगण्यावरून येत आहे. (बघा पुढील भागात सविस्तर माहिती)