धक्कादायक: दाम्पत्याला जंगलात नेवून मारहाण करून लुटले
Byसाहसिक न्यूज24
मुक्ताईनगर / पंकज तायडे:
लंघूशंकेसाठी रस्त्यावर थांबलेल्या दाम्पत्याला सात ते आठ जणांनी जंगलात नेवून मारहाण केली तर विवाहितेच्या अंगावरील दागिने आणि रोकड असा एकुण ३७ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जबरी लुटून नेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीसांनी सहा जणांना अटक केली आहे. पंकज रामसिंग राठोड वय २१ रा. जोंधनखेडा ता. मुक्ताईनगर येथे हा तरूण आपल्या पत्नी सपना सह वास्तव्याला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील माळेगाव शिवारातील कालिंका माता मंदीरा जवळ दाम्पत्य हे बुधवारी १७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास रस्त्याने जात होते. त्यावेळी दोघेही लघुशंकेसाठी थांबले. त्याचवेळी बहादूर तोरे, आणि प्रताप याच्यासह इतर ७ अनोळखी जाण येवून दोन्ही पती-पत्नीला जंगलात नेवून बेदम मारहाण केली. तर पत्नी सपनाच्या आंगावरील दागिने व बाराशे रूपयांची रोकड असा एकुण ३७ हजार २०० रूपयांचा मुद्देमाला जबरीने चोरून नेला आहे. याप्रकरणी दाम्पत्याने मुक्ताईनगर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील सात संशयित आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.