नंदीची मूर्ती पाणी, दुध पीत आहे, हा चमत्कार नाही – पंकज वंजारे,अ.भा.अंनिस
नंदीची मूर्ती पाणी, दुध पीत आहे, हा चमत्कार नाही -पंकज वंजारे,अ.भा.अंनिस
नंदीची मूर्ती पाणी, दुध पीत असल्याचा व्हिडिओ सध्या देशभर वायरल होतोय. त्या विडिओत आपण निरिक्षण केल तर , दगडाची मूर्ती पाणी, दुध पीत नाही आहे. ते पाणी , दुध मूर्तीवरून खाली उतरत आहे. मूर्तीच्या खालील भाग ओला झाल्याचा तो प्रत्यक्ष पुरावा आहे. चमत्कार होतात यावर श्रद्धा ठेवणारे लोक स्वतःच स्वतःची यातून मानसिक फसवणूक करत आहे, हे आपण सर्वांनी समजुन घेतले पाहीजे. *या मागे सरफेस टेंशन चा नियम काम करतो. हे ही सत्य नाही. सोबतच इतर कारण नाही. इथे काय घडतय ? तर , चमच्या वर उचलला की दुध ,पाणी मूर्तीवरून खाली उतरत.* ते पाणी , दुध खाली साचलेल सर्वांना दिसत पण , आम्ही हा चमत्कार नाही , हे का स्वीकारत नाही ?
चमत्कार स्वीकारण्या मागील मानसिकता
या मागे एकमात्र कारण म्हणजे , आमच्या मेंदूत संस्कारातून रुजवलेल असत की, चमत्कार घडतातच. हे पक्क विचारात असत. तशी मानसिकता प्रबळ असते. आम्हाला मनापासून वाटत की, चमत्कार घडला पाहीजे. या संदर्भात कुठलीही कृती, घटणा घडली की , ती संधी आम्ही सोडत नाही आणि मग तशी कृती करतो. ऐकलेल सांगत सुटतो , मॅसेज वायरल करत असतो . याला अतार्किक विचारातून , शब्दप्रामाण्य आणि ग्रंथप्रामाण्यातून (म्हणजे , वाचलेले , ऐकलेल सत्य मानणे. त्याची चिकित्सा करायची नाही , त्याचा पुरावा मागायचा नाही, प्रश्न विचारायचा नाही .) केलेली कृती म्हणतात.
अ.भा. अंनिस संस्थापक , राष्ट्रीय संघटक तथा जादुटोणा विरोधी कायद्याचे रचनाकार प्रा.श्याम मानव यांनी रचना केलेल्या जादुटोणा विरोधी कायद्या अंतर्गत अनुसुची 2 प्रमाणे ,तथाकथीत चमत्काराचा प्रयोग प्रदर्शित करून , त्या द्वारे आर्थिक प्राप्ती करणे आणि अशा तथाकथित चमत्कारांचा प्रचार व प्रसार करून लोकांना फसवणे , ठगवणे आणि त्यांच्यावर दहशत बसविणे. जादुटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा आहे.
चमत्कार सिद्ध करा
चमत्कार सिद्ध करा ( लेखी आव्हान प्रक्रिया पूर्ण करून ) आणि 25 लाख रुपये मिळवा . हे आव्हान अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सतत देत आली आहे. ज्यांना वाटतं…नंदीची मूर्ती पाणी , दूध पीत आहे , त्यांनी हे आव्हान स्वीकाराव. व्हिडीओ वायरल करून समाजाची दिशाभूल करू नये. जादुटोणा विरोधी कायद्या अंतर्गत आपणावर गुन्हा दाखल होऊ शकतो.
मित्रहो , संतांनी चमत्कार होत नाही . हे आपल्या अभंगांमधून सांगितले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी चमत्काराच्या संदर्भात दिलेली वैचारिक शिकवण आपण समजून घेतली पाहिजे. ते म्हणतात …
” चमत्काराच्या भरी भरोनि । झाली अनेकांची धुळधाणी ।
संत – चमत्कार यापुढे कोणी । नका वर्णू , सज्जन हो ! ॥ 50॥
“वास्तविक संत नव्हे जादुगार । करावया चमत्कार।*
हा तो चालत आहे व्यवहार। पोटभ-यांचा ॥ 68॥ ”
– राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ,
(ग्रामगीता – अ. 31)
नंदीची मूर्ती पाणी, दुध पीत आहे, हा चमत्कार नाही. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये,पंकज वंजारे
महाराष्ट्र राज्य युवा संघटक अ.भा.अंनिस वर्धा
9890578583