परिणाम हेल्थ केअर प्रा. लि. चा दै. साहसिकनी भंडाफोड करताच अमरावतीचा दलाल गणेश जेगडे याने अमरावतीचा धंदा भुसावळला हलविला
साहसिक वृत्त :
अमरावती : दैनिक साहसिक वृत्तपत्रानी परिणाम हेल्थ केअर प्रा. लि. पंजाब (लुधियाणा) येथील आयुर्वेद औषधी बनविणार्या विनोदसिंग व त्याचा सुपूत्र ज्याने आयुर्वेदिक ची पदवी प्राप्त न करताच डॉक्टर हा शब्द वापरुन वर्धा जिल्ह्यासह १० राज्यातील २०० जिल्ह्यातील लोकांना नेटवर्विंâग च्या माध्यमातून ५२ प्रकारच्या आयुर्वेदिक औषधी विकण्याचा गोरखधंदा मागील ४ वर्षापासून नागपूर येथील भाड्याच्या घरातून सुरु आहे. नागपूर येथील भारत माता आंबेडकर बगीचा मागे छपरु नगर चौक येथील कार्यालय दाखवून लोकांना बेवकुफ बनवित आहे. ब्राँच ऑफिस असताना या ठिकाणी कोणताही बोर्ड नाही. कंपनीचा रेकॉर्ड नाही. ऑफिस नावाची गोष्ट नाही तरी सुद्धा महाराष्ट्रातील उपराजधानी नागपूर येथे ऑफिस दाखवून संपुर्ण महाराष्ट्रात मालाची विक्री करण्याचा गोरखधंदा विनोदसिंग याने चालविला आहे.
दै. साहसिक वृत्तपत्रातून परिणाम हेल्थ केअर प्रा. लि. कंपनीचा भंडाफोड होताच विनोदसिंग याने मोबाईल मध्ये असलेले ४ गृ्रप बंद केले. आणि वर्धा शहरात दर १५ दिवसांनी नेटवर्किंगची सभा हॉटेल गणराज मध्ये होत होती, ती सभा बंद झाली. या धंद्यात पैशाची हवस असलेल्या हिंगणघाट उपजिल्हा सामान्य रुग्णालयाचा नेत्रतज्ञ डॉ. संजय बोबडे हा नकली डॉक्टर बनून परिणाम हेल्थ केअर आयुर्वेदिक औषधी घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहन करीत होता. या धंद्यात शासकीय नोकरी असल्यामुळे डॉ. संजय बोबडे स्वत:चे नावानी एजन्सी घेवू शकत नव्हता. म्हणून त्यांनी आपली पत्नी च्या नावे परिणाम हेल्थ केअर प्रा. लि. ची लाखड, बुकटी विकण्याचा धंदा उचलला होता. या धंद्यात डॉ. संजय बोबडे यांनी त्यांच्या विभागातील ५ नर्सना सुद्धा ओढले. यामुळे या दोन्ही नर्स शासकीय नोकरीला दांडी मारुन परिणाम हेल्थ केअर प्रा. लि. ची औषधी विकण्याचे सभेत हजर राहून डान्स करीत माल विक्री करायच्या. त्याचे व्हिडीओ दै. साहसिकनी प्राप्त केले आहे. या गोरखधंद्याचा पर्दाफाश होताच डॉक्टर बोबडे यांनी तात्पुरता या धंद्याला विराम दिला आहे. यामुळे वर्ध्याचा धंदा मराठवाडा येथून आयात केलेला गणेश जेगडे याला चालविण्यासाठी दिला. गणेश जेगडे हा अमरावती जिल्ह्याचा प्रमुख दलाल असून या गणेश जेगडे नी मागील २ वर्षात १० हजार ग्राहकांना परिणाम हेल्थ केअर प्रा. लि. ची बोगस आयुर्वेदिक औषधी विकली आहे. आणि पुन्हा वर्धा जिल्ह्याचा प्रभार घेवून वर्धा जिल्ह्यातील लोकांना ‘भिकेला’ लावण्याचा प्रयत्न गणेश जेगडे करीत आहे. परिणाम हेल्थ केअर प्रा. लि. कंपनी डुगरी (लुधियाणा) यांनी बनविलेली ५२ प्रकारची औषधी बोगस आहे. या औषधी मुळे एखाद्या रुग्णाला आतापर्यंत आराम पडला नाही. पण २०० रुपयाची औषधी नेटमार्वेâटिंग च्या माध्यमातून १२०० रुपयाला विकली जात आहे. नेटवर्किंग मध्ये येणार्या ग्राहकाला जास्त कमिशन चे आमिष दाखवून या धंद्यात एजंन्सी घेण्याचे स्वप्न दाखविल्या जाते. यासाठी अमरावती जिल्ह्यातील हिरवेगार व थंड हवेचे ठिकाण असलेले विदर्भाचे नंदनवन चिखलदरा या ठिकाणी ‘विनोदसिंग’ हा पार्टी आयोजित करुन ‘ क्रिष्णा कन्हैया’ बनून महिलांसोबत डान्स करीत ‘परिणाम हेल्थ’ चा माल विकल्यानंतर ‘आनंदी जिवन’ जगता येतो, असा संदेश देण्याचा प्रयत्न करतो.
क्रमश: