वैदेही कॅटरर्सला १० हजार रुपयांचा दंड ठोठावला, अन्नसुरक्षा ठेवण्यात हलगर्जीपणा नडला.

0

🔥वैदेही कॅटरर्सला १० हजार रुपयांचा दंड ठोठावला,अन्नसुरक्षा ठेवण्यात हलगर्जीपणा नडला.

वर्ध -/ कॅटरर्सचा व्यवसाय करणाऱ्या येथील वैदेही कॅटरर्सच्या मालकास १० हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे. जिल्हा अन्न व औषधी कार्यालयाने ही कारवाई केली आहे.स्थानिक शिववैभव सभागृह परिसरातील भाड्याचे घर घेत आरभी पितापुत्र हा व्यवसाय करतात. निवासी भागात असे व्यवसाय करण्यास सक्त मनाई आहे. कारण मोठ्या प्रमाणात व्यावसायिक सिलेंडर साठा हे ठेवतात. तसेच गाड्यांची वर्दळ व काम करणाऱ्या महिला व वेटर यांचे आवाज यामुळे शांततेचा भंग होतो. या बद्दल अनेकांनी तक्रारी केल्यात. पण कारवाई झाली नव्हती. म्हणून काही प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्यांनी मालकास तंबी दिली. त्यावेळी आरभीने रडत माफी मागत दुसरीकडे जाणार असल्याचे सांगितले. पण तरीही धंदा सुरूच ठेवल्याने याची तक्रार अन्न व औषधी खात्यास करण्यात आली. त्यांनी धाड टाकली. तेव्हा अळ्या पडलेले धान्य व सडका भाजीपाला आढळून आल्याची चर्चा परिसरात वेगाने पसरली. मात्र अन्न व औषधी विभागाचे उपायुक्त टोपले हे म्हणाले की सार्वजनिक अन्न पुरवठ्याचे कठोर निकष व नियम आहेत. ते पाळावेच लागतात. या प्रकरणात अन्न सुरक्षा विषयक निकष पाळल्या जात नसल्याचे आमच्या चमूस दिसून आले. ही बाब आरोग्यास अपायकारक म्हणून दंड ठोकला. त्याने तो भरला आहे. पण हे चालूच राहल्यास कठोर कारवाई केल्या जाईल असे टोपले यांनी पत्रकारांना सांगितले.

वर्धा पालिकेने पण यास नोटीस दिल्याचे सांगितले. तसेच अन्न पुरवठा विभागाने धाड टाकून पाहणी केली. १० ते १५ गॅस सिलेंडर निष्काळजीपणे ठेवून असल्याचे दिसले. जर दुर्घटना घडली तर लगतच्या चार पाच घरांना हानी होण्याची शक्यता व्यक्त झाली. धाड टाकल्याबद्दल पुरवठा खात्याने दुजोरा दिला आहे. असे असून व व्यावसायिक सिलेंडर पुरवठा बंद असतांना आरभी पितापुत्र रोज ऑर्डर घेत असल्याचे दिसून येत आहे. जर स्फ़ोट झाला तर जबाबदार कोण, असा प्रश्न विचारल्या जात असल्याने प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

      ब्युरो रिपोर्ट साहसिक          News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!