पवनार नगरीत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न.

0

पवणार : धन्य ते जन्मले संसारी संत जगनाडे महाराज.श्री ह भ प अनंत कोसे महाराज.पवनार नगरीत संत जगनाडे महाराज यांचा जयघोष करीत टाळ मृदुंगाच्या नादाने गाजली पवनार नगरी.तसेच ब्यांड बाजा टाळ मृदुंग व संताजी जगनाडे महाराज की जय च्या जयघोष नादाने पवनार नगरी दुमदुमून उठली.संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय संस्था आणि संताजी जगनाडे महाराज तेली समाज संघटन पवनार च्या वतीने पवनार नगरीत संताजी जगनाडे महाराज यांचा ३३५ वा पुण्यतिथी सोहळा दिनांक ७ जानेवारी रोजी हिवरे सभागृह पवनार येथे आहात उत्साहात पार पडला.या वेळी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पालखी पूजन करून गावातून बँड बाजा,भजन दिंडी, पताका पालखी, तसेच बैलबंडीच्या रथयात्त्रेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते या वेळी गावातून शोभा यात्रा काढली असता ठीक ठिकाणी चहा,पाणी,नास्ताचे, फराळाचे लंगर ग्रामस्थांन कडून करण्यात आले होते.बाजार चौक मित्र मंडळ पवनार च्या वतीने भव्य नास्ता लंगर चे आयोजन,विशाल नगराळे, दिलीप पाटील, किरण वाघमारे, सतीश लाखे,निखिल देवतळे,वैभव हुलके,सुभाष वैद्य,प्रमोद घुगरे,सागर वैद्य,मयुर बांगडे,बबलू सुरसकर,जिवन हिवरे,निखिल देवगिरीकर,रवि कावळे इत्यादींनी लंगर कार्यक्रमा करिता सहकार्य केले.बैलबंडी रथ,दिंडी पताका,भजन मंडळी,पालखी,तसेच बँड बाज्याने गावात उत्सहास सह आनंदी व भक्तीमय वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत होते.हिवरे सभागृह या ठिकाणी संघटने च्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले असून संत तुकाराम महाराज यांची गाथा काही समाजकंटकांनी पाण्यात बुडवून नष्ट केली असता संताजी जगनाडे महाराज यांनी जशी च्या तशी लिहून देत संत तुकाराम महाराजांना दिली त्या मुळे धन्य ते महाराज जनमले संसारी ऐसा संत होणे पुन्हा नाही.संताजी जगनाडे महाराजानी सर्व समाजाचे कल्याण केले.जशे संताजी जगनाडे महाराजानी कार्य केले तसेच कार्य आपणही करावे मरावे परी कीर्ती रुपी उरावे महाराजानी केलेले कार्य अमर असल्याचं श्री ह भ प अनंत कोसे महाराज काल्याच्या कीर्तनात बोलत होते.त्यावेळी संस्थेच्या वतीने वसंतराव हिवरे यांनी सुंदर बैलबंडी सजावटी करून आणलेल्या बैलबंडी धारकांना व दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी भजन मंडळींना श्री संताजी जगनाडे महाराज यांची फोटो प्रतिमा व रोख मानधन देण्यात आले. वृद्ध,अपंग, विधवा, निराधार, यांना राजमुद्रा ऑनलाईन सेंटर पवनार. आशिष कांबळे यांनी कार्यक्रमात कॅम्प घेऊन हयातीचा दाखला (जीवन प्रमापत्र) मोफत स्वरूपात काढून देण्यात आले.

पवनार,कान्हापुर गोंदापुर,महाकाळ, वाहितपुर,वरूड, येथील शेकडो नागरिकांनी आपले प्रमाणपत्र काढून कॅम्प चा लाभ घेतला, याच प्रमाणे सतत असाच उपक्रम गावात राबविण्यात यावा असे मत ह.भ.प.श्री अनंत कोसे महाराज यांच्या कडून व्यक्त करण्यात आले. या वेळी उपस्थित संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बाजीराव हिवरे,उपाध्यक्ष मुरलीधर वैद्य,सचिव गणेश हिवरे कोषाध्यक्ष विनोद बोरकर सदस्य निलेश डुकरे, महेंद्र वाघमारे, महादेव देवतळे, अरुण खेलकर, रंजना वैद्य, अलका भुरे, विजया पाहुणे, सीमा साखरकर, ज्योती माजरे रंजना आंबटकर,अर्चना वंजारी,कलावती लाडे,नारायण धांदे, ज्ञानेश्वर भुरे,नारायण गोमासे,रामदास चोंदे,नरेंद्र बांगडे,गणपत हिंगे,प्रकाश चोंदे, गजानन बांगडे,किशोर दांडेकर,अर्जुन पेटकर,पवन गुल्हाने,पंकज मरसकोल्हे,अक्षय सोंनटक्के,गणेश गोमासे,आशिष सोनटक्के,गणेश हजारे, विलास धवने, तसेच समस्त पवनार ग्रामवासी आदींनी परिश्रम घेत सहकार्य केले.

सतीश अवचट साहसिक न्यूज-24 पवणार-वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!