हिंगणघाट -/तालुक्यातील माथनकर येथे सोशलमिडियाच्या इंस्टाग्रामच्या वादातून २३ वर्षीय तरुणांवर चाकूने हत्या केल्याची घटना ८ फेब्रुवारीला रात्री ११ वाजता उघडकीस आली आहे.मृत्यक तरुणाचे नाव हिमांशु किशोर चिमने असे आहे. प्राप्त माहितीनुसार मृतक हिमांशु चिमने व यातील आरोपी मानव जुमनाके यांचा मागील एक ते दिड महिण्यापुर्वी इंस्टाग्रामवर ठेवलेल्या स्टोरि वरुन वाद झाल्याने हिमांशु हा त्याचे दोन मित्रांसोबत वाद मिटवनेकरीता मानव जुमनाके याने बोलाविले वरुन पिंपळगाव माथनकर येथे गेला असता तेथे मानव जुमनाके व हिमांशु चिमने यांच्यात पुन्हा शाब्दीक वाद झाला. तेव्हा मानव जुमनाके याने हिमांशु याला पकडुन ठेवले व अनिकेत जुमनाके याने हिमांशु याला चाकुने गळ्यावर व छातीवर वार करुन जिवानिशी ठार मारले.सौ.सिमा किशोर चिमने यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करुन तपासात घेतला. पुढिल तपास पोलिस उपनिरीक्षक ताराम करीत आहे.