…पुन्हा वर्धा आगाराच्या वाहकाने सेलूच्या प्रवाशांना वर्धेच्या मधातच रस्त्यावर उतरून दिले

0

साहसिक न्यूज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
सेलू येथे नागपूर यवतमाळ मार्गावर धावणाऱ्या सर्व सुपर बसेसला अधिकृत थांबा असतांना बसचालक वाहकाची मुजोरी कायम आहे सोमवारी ता २९ ला वर्धा आगाराच्या नागपूर कडे जाणार्‍या बसवाहकाने सेलूचे प्रवाशांना वर्धेत मधातच रस्त्यावर उतरून दिल्याचा प्रकार उघडकीस आला यात शालेय विद्यार्थ्यांनीसह वयोवृद्ध नागरीकांचा समावेश होता या बारा ते तेरा प्रवाशांना परत गावाकडे जाण्यासाठी बस पकडण्यासाठी पायी बसस्थानकाचा मार्ग धरावा लागला हे असे प्रकार नेहमीचे झाले असून वरिष्ठही याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
सेलू तालुक्याचे ठिकाण असताना बस पकडायची झाली तर प्रवाशांना मुख्य महामार्गावर रस्त्याचे कडेला उभे राहून बस पकडावी लागते तिथेच जुन्या बायपासवर येथील प्रवाशांना उतरविले जाते आता नवीन बायपासमुळे अनेक वाहनचालक सेलूचे प्रवाशांना बसचा सेलू येथे थांबा नसल्याचे सांगत प्रवाशांना खाली उतरवून देते हे प्रकार अनेकदा प्रवाशासोबत घडत आहे येथे बसस्थानक असूनही बस बसस्थानक वर आणल्या जात नाही त्यामुळे येथील प्रवाशांना वर्धा नागपूर जायचे झाल्यास बायपासवर उभे राहून बस पकडावी लागत होती आता नवीन बायपासमुळे बसेस परत सेलूत न आणता सरळ मार्गाने जात आहे यात सेलूचे प्रवाशांना, विद्यार्थ्यांना बराच त्रास सहन करावा लागत आहे येथे सकाळी वर्धेकडे जाणाऱ्या बसेस बायपास ने जात असल्याने विद्यार्थ्यांना बसची प्रतिक्षा करावी लागते यामुळे या विद्यार्थ्यांना वेळेत शाळेत जाणे कठीण होत असल्याने त्यांचेकडे पास असूनही खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो यावरून अनेकदा वाद निर्माण होत असल्याने वर्धा बसस्थानकावर सेलूला सर्व बसेसचा थांबा असल्याचा फलक लावण्यात आला पण अजूनही बसवाहक चालकाची मुजोरी कायम आहे त्यातच वर्धा आगार प्रमुखांची याबाबत वर्तणूक चांगली नसून ते उद्धटपणे बोलून सेलूचे प्रवाशांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचे दिसून येते सोमवारी तर वर्धा आगाराच्या वर्धा बसस्थानकावरून सायंकाळचे सुमारास ५ वाजून १० मिनिटाने सुटलेल्या नागपूर कडे जाणार्‍या बस क्रमांक एम एच ४० ऐवाय ५०७९ या बसचालकाला विचारणा केल्यावर बसमध्ये बसलेल्या सेलूचे प्रवाशांना बसवाहकाने अपमानास्पद वागणूक देत वर्धेत रस्त्यावर उतरून दिले हा प्रकार अतिशय घृणास्पद असून याबाबत वरीष्ठाकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला वरिष्ठांनी तसेच लोकप्रतिनिधीनी यांची गांभीर्याने दखल घेऊन यास जबाबदार असणार्‍या बसचे वाहकावर त्वरीत कारवाई करावी अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!