पुलगावात धक्कादायक प्रकार: धावत्या कारमध्ये केला बलात्कार प्रकरणी आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी

0

Byसाहसिक न्यूज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा : जिल्ह्यात पुलगाव येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळेत जाताना 13 वर्षीय मुलीला चाकूचा धाक दाखवत अपहरण केले. कार मध्ये बसवून धावत्या कार मध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला असल्याची घटना घडली. या प्रकरणी दोघांना पुलगाव पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी दोन्ही आरोपींना वर्ध्याच्या पोस्को अंतर्गत विशेष नयालयात पेश करण्यात आले. यावेळी न्यायालयाने आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.पीडित मुलगी शाळेत निघाली असता तिला कार मध्ये जबरदस्तीने बसवले. त्यानंतर धावत्या कारमध्येच तिच्यावर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी पुलगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पुलगाव येथील 13 वर्षीय पीडिता ही दररोज प्रमाणे घरुन शाळेत जाण्यासाठी निघाली. शाळेत जात असतानाच तिला सुमेध मेश्राम नामक युवक आणि एका अनोळखी युवकाने आवाज दिला. पीडिता ही शाळेसमोरील प्रवेशद्वाराजवळ थांबली असता, आरोपी नराधम सुमेध याने चाकूचा धाक दाखवून तिला जबरदस्ती कारमध्ये बसविले.
पीडितेला गाडीत बसविताच सुसाट वेगाने कार पळवली. दरम्यान, धावत्या कारमध्येच आरोपी सुमेध याने पीडितेवर अत्याचार केला. तसेच ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, या सर्व प्रकारानंतर पीडिता प्रचंड घारबली. तिने आपल्या पालकांना घडलेली सर्व घटना सांगितली. मुलीवर अत्याचार झाल्याचं कळताच, आईने तातडीने पोलीस ठाणे गाठले. पीडितेच्या आईने सुमेध आणि गाडी चालकाविरुद्ध तक्रार दिली.
तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनीही तत्काळ घटनेची दखल घेत आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना केले.
सुमेध मेश्राम याचा शोध घेत असताना त्याला देवळी येथून अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्याला देखील पोलिसांनी अटक केली. बुधवारी दोघांना देखील वर्ध्याच्या न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांकडून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!