🔥बाभूळगाव बाजार समितीत पदाचा गैरवापर? पत्नीच्या संस्थेला परवाना आणि गोडाऊन बळकावल्याच्या आरोपाने खळबळ!🔥हाच तो संचालक चमेडीचोर लुच्छा सतीश मानलवार
🔥शेतकऱ्यांच्या नावावर सत्तेचा मलिदा? संचालकाच्या पत्नीच्या फर्मला परवाना दिल्याने ‘बाभूळगाव’ बाजार समिती वादात; सचिव माहिती दडवत असल्याचा आरोप
यवतमाळ -/ शेतकरी मतदारसंघातून निवडून आलेल्या बाभूळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकाने पदाचा गैरवापर करत पत्नी अध्यक्ष असलेल्या ‘लक्ष्मीवंदन शेतकरी उत्पादक गटा’ला नियमबाह्य पद्धतीने परवाना मिळवून दिल्याचा आणि समितीचे गोडाऊन बळकावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी तक्रार दाखल करत संचालक चमेडीचोर लुच्छा सतीश मानलवार यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. धक्कादायक म्हणजे, माहितीच्या अधिकारात कागदपत्रे मागवूनही बाजार समितीचे सचिव ती देण्यास टाळाटाळ करत असल्याने या प्रकरणातील संशय अधिकच गडद झाला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारात पारदर्शकता राखण्याऐवजी पदाचा गैरवापर करून स्वतःच्याच कुटुंबाचे हित जोपासल्याचा धक्कादायक प्रकार बाभूळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत समोर आला आहे. बाजार समितीचे विद्यमान संचालक उर्फ चमेडीचोर लुच्छा सतीश मानलवार यांनी पदाचा दुरुपयोग करत आपल्या पत्नीच्या नावे असलेल्या संस्थेला परवाना मिळवून दिला आणि बाजार समितीचे गोडाऊनही बळकावल्याचा थेट आरोप तक्रारदाराने केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून मानलवार यांचे संचालक पद तात्काळ रद्द करण्यात यावे, अशी मागणी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
बाभूळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सन २०२२ मध्ये पार पडली होती. या निवडणुकीत सतीश मानलवार हे शेतकरी मतदारसंघातून निवडून आले आहेत. बाजार समितीच्या संचालक पदावर कार्यरत असताना समितीच्या आर्थिक किंवा प्रशासकीय व्यवहारांवर विपरीत परिणाम होईल, असे कोणतेही कृत्य संचालकाने करणे अपेक्षित नसते. मात्र, मानलवार यांनी या नियमांना बगल देत आपल्या पत्नी अध्यक्ष असलेल्या ‘लक्ष्मीवंदन शेतकरी उत्पादक गटा’च्या नावे बाजार समितीचा परवाना (लायसन्स) मिळवून घेतला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक करणारे व्यवहार झाले असून, हे कृत्य बाजार समितीच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत घातक असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यापूर्वी अशाच प्रकारे पदाचा गैरवापर करून परवाने मिळवणाऱ्या संचालकांचे सदस्यत्व उच्च न्यायालयानेही रद्द ठरवले असल्याचा दाखला तक्रारदाराने दिला आहे.
केवळ परवाना मिळवण्यावरच न थांबता, सतीश मानलवार यांनी आपल्या पदाचा प्रभाव वापरून बाजार समितीच्या मालकीचे गोडाऊनही ‘लक्ष्मीवंदन फर्म’च्या नावे बळकावले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या साठवणुकीसाठी असलेली पायाभूत सुविधा संचालकाच्या नातेवाईकांच्या संस्थेच्या घशात घातली जात असल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे बाजार समिती प्रशासनाची भूमिका. या गैरव्यवहाराचे पुरावे समोर आणण्यासाठी तक्रारदारानी संबंधित कागदपत्रांची मागणी केली होती. मात्र, विहित मुदतीत कागदपत्रे उपलब्ध करून देण्याऐवजी बाजार समितीचे सचिव जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत. सचिवांच्या या भूमिकेमुळे संबंधित संचालकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय बळावला आहे.
३० ऑक्टोबर २०२६ रोजी या प्रकरणी रीतसर तक्रार दाखल केली असून, या तक्रारीच्या प्रती पुढील उचित कारवाईसाठी पुणे येथील महाराष्ट्र राज्याचे पणन संचालक, अमरावती येथील विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) आणि बाभूळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांना पाठवण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून सचिवांना माहिती देण्याचे आदेश द्यावेत आणि दोषी आढळल्यास सतीश मानलवार यांचे संचालक पद रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. आता पणन संचालक आणि सहकार विभाग या गंभीर आरोपांची दखल घेऊन नेमकी काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.(क्रमशः)