बायकोच्या खुर्चीवर नवराच ठरतोय भारी… आष्टा (मांडवगड) ग्रामपंचायत मधील प्रकार
साहसिक न्यूज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
शासनाच्या नियमानुसार सरपंचाच्या पतीने हस्तशेप करू नये असे असतानाही सुद्धा शासनाच्या नियमाला बघल देऊन सरपंच बाईचे पतीदेव स्वताच आष्टा ग्रामपंचायत कारभार चालवत असल्याचे स्वतः हा सरपंच जया वेले यांनी सांगितले. वर्धा शहरापासून काही अंतरावर असलेल्या आष्टा गावातील ग्रामपंचायत मधील सरपंच महिला जया वेले या असून सरपंचबाईचे पतीदेव प्रमोद वेले हे स्वतःलाच सरपंच समजून वागत आहे.सरपंचबाईच्या पतिला कुठल्याच प्रकारचे पद नसतानाही आष्टा गावातील नित्कृष्ट दरज्याच्या नाल्याचे बांधकाम केले असता आष्टा गावातील काही नागरिकांच्या सांगण्यावरून सहासिक प्रतिनिधी ने माहिती घेण्यासाठी सरपंच जया वेले यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, माझे पती प्रमोद वेले यांना विचारा असे सांगितले असता आष्टा गावातील वॉर्ड नं.3 येथील झालेल्या निकृष्ट दर्जाच्या नाल्याचे बांधकाम यामधील ठेकेदार व सरपंच बाईचा पती प्रमोद वेले यांनी पैसे खाल्ल्याचे आष्टा गावातील नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.या गावातील ग्रामसेवक सुध्दा सरपंच बाईच्या पतीला घाबरत असल्याने त्यांनी सुध्दा माहिती देण्यास नकार दिला हे विशेष…यावरती काही कारवाई होईल की नाही? यावर मात्र आष्टा गावातील नागरिकांन मध्ये प्रश्न पडला आहे….