बा… रे … ! रुग्णवाहिकेची दुचकिला धडक ; एक ठार, एक गंभीर

0

हळदीचे जेवण बेतले अनिकेतच्या जिवावर

देवळी/ सागर झोरे:
देवळी शहरातील वर्धा ते यवतमाळ हायवे रोडवर 6 मे रोजी रात्रीच्या सुमारास 8.30 वाजताच्या सुमारास शिवशंकर भोजनालयाजवळ मागून येत असलेल्या रुग्णवाहीका क्रमांक एमएच 32 क्यू 1156 या गाडीच्या चालकाने वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून मोटरसायकल क्रमांक एमएच 32 झेड डी 9329 या गाडीला मागून धडक दिल्याने यामध्ये एक ठार तर एक गंभीर जखमी झाले आहेत.

सौरभ झाडे व त्याचा मित्र अनिकेत नांदुरकर रा . पळेगाव हे दोघेही एम एच 32 ऐ डी 9328 या गाडीने हळदीच्या कार्यक्रमाला वायगाव रोडवर असलेल्या दत्त मंगल कार्यालयात जात असताना यवतमाळ ते वर्धा महामार्गावरील शिवशंकर भोजनालयाच्या समोर असलेल्या नाल्याजवळ देवळी वर्धा येथे रुग्णवाहीका चालकाने त्याच्या ताब्यातील ॲम्बुलन्स भरधाव वेगाने चालवून मोटार सायकल ला धडक दिल्याने मोटार सायकल वर मागे बसलेला अनिकेत नांदुरकर व सौरभ झाडे ही दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सावंगी मेघे येथील रुग्णालयात भरती केले उपचार्यादरम्यान अनिकेतचा मृत्यू झाला तर सौरभ झाडे याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे .
देवळी पोलिस ठाण्यात रुग्णवाहीका चालकविरुद्ध कलम 279,304अ 337, भांदवि सह कलम 184,मोवाका देवळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक डोणेकर करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!