बिडकीन येथे जलवाहिनीचे काम मंद गतीने सुरू,जडवाहतुक वाहनांच्या कोंडी मुळे वाद विवाद….

0

औरंगाबाद,बिडकीन-/ पैठण तालुक्यातील बिडकीन येथे दोन महिन्यापासून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने जलवाहिनीचे काम सुरू आहे. जलवाहिनीच्या कामासाठी शासकिय कामासाठी विना क्रमांक असलेल्या वाहनांचा वापर होताना दिसून येत आहे. या वाहनाकडून अपघात किंवा घटना घडल्यास याला जबाबदार कोण अशी चर्चा सर्व सामान्य नागरिकांमध्ये होताना दिसून येत आहे. शासनाच्या कामांसाठी विना क्रमांक वाहने वापरले जातात याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकीकडे वाहतूक शाखेकडून विना क्रमांक वाहने वापरल्याने वाहन धारकावर दंडात्मक कारवाई केली जाते तर दुसरीकडे मोठी वाहने नियमबाह्य पद्धतीने वाहतूक करतांना दिसत आहे यांच्यावर संबंधीत शासन कारवाई करणार का अशी चर्चा बिडकीन येथील नागरीक व वाहन धारकामधे होताना दिसून येत आहे. शेकटा फाटा ते निलजगाव फाटा पर्यंत जड वाहतूक बंद करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले असताना मात्र सर्रास पणे बिडकीन मधून मुरूम, वाळू, विट खडीचे वाहतूक करणारे हायवा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता दिवस रात्र जड वाहतूक सुरू असून यामुळे अनेक वेळा वाहनांची कोंडी होऊन वाद विवाद छोट्या मोठ्या वाहन धारकांमध्ये होताना दिसून येत आहे.

अर्षद शेख साहसिक news -/24 औरंगाबाद,बिडकीन 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!