🔥 हाच तो यवतमाळ जिल्हा भाजपचा गुंड सचिव सतीश उर्फ लुच्चा मानलवार या चमडीचोर मुळे कृष्णापूर हादरले! डोफे कुटुंबावर सशस्त्र हल्ला करूनही हा आरोपी मात्र मोकाट.
🔥दलीतांवर होत असलेल्या अन्यायावर पालकमंत्री संजय राठोड काही बोलले का ?
बाभुळगाव -/ यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यातील कृष्णापूर येथे मानवतेला काळीमा फासणाऱ्या खैरलांजी हत्याकांडाची भयानक पुनरावृत्ती होता-होता राहिली. सत्तेच्या नशेत माजलेला भाजपचा जिल्हा सचिव सतीश नारायण मानलवार आणि त्याच्या ५४ सशस्त्र गुंडांच्या टोळीने स्थानिक दलित डोफे कुटुंबावर थेट घरात घुसून जीवघेणा हल्ला चढवला. या रक्तरंजित हल्ल्यात डोफे कुटुंब बालंबाल बचावले असले, तरी गावात उडालेला थरकाप अद्याप कायम आहे. गुन्हा दाखल होऊनही मुख्य सूत्रधार सतीश मानलवार उजळ माथ्याने पोलीस ठाण्याच्या आवारातच फिरताना दिसत असून, पीडित कुटुंबावर सतत पाळत ठेवून दबाव आणत आहे. या भयानक दहशतीमुळे संपूर्ण जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
सत्तेची मस्ती, जातीय द्वेष आणि कायद्याचे उडालेले धिंडवडे याचे किळसवाणे प्रदर्शन बाभुळगाव तालुक्यातील कृष्णापूर गावात पाहायला मिळाले आहे. राजकीय वरदहस्त लाभलेला भाजपचा जिल्हा सचिव सतीश नारायण मानलवार याने तब्बल ५४ जणांची टोळी जमवून गावातील दलित डोफे कुटुंबावर सुनियोजित प्राणघातक हल्ला चढवला. संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकण्याच्या इराद्याने झालेल्या या हल्ल्यात सुदैवाने डोफे कुटुंबीय बालंबाल बचावले. मात्र, एवढी गंभीर आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडूनही बाभुळगाव पोलीस ठाण्याचे प्रशासन आरोपींना वाचवण्यातच मग्न असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.
कृष्णापूर येथे घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सतीश मानलवार याने गावात जाऊन चिथावणीखोर वक्तव्ये करत टोळीला भडकवले आणि थेट डोफे यांच्या घरावर सशस्त्र हल्ला घडवून आणला. एवढा भीषण अत्याचार झाल्यानंतरही या घटनेचा मुख्य सूत्रधार मानलवार याच्या मुसक्या आवळण्याचे धाडस पोलीस दाखवू शकलेले नाहीत. उलट, तो आपल्या गुंडांसह डोफे कुटुंबाच्या घरावर दिवसरात्र पाळत ठेवून त्यांना दहशतीखाली ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पीडित कुटुंबाच्या घराभोवती गावगुंड उघडपणे फिरत असल्याने डोफे कुटुंबाच्या अब्रूवर आणि जीवितावर थेट घाला घातला जात असूनही त्यांना अद्याप कोणतेही पोलीस संरक्षण पुरवण्यात आलेले नाही. या गंभीर प्रकरणी बाभुळगाव पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल असतानाही आरोपी सतीश मानलवार आणि त्याचे साथीदार बाभुळगाव पोलीस ठाण्याच्या परिसरात बिनधास्त वावरताना दिसत आहेत. ठाणेदार दीपमाला भेंडे आणि संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यपद्धतीवर यामुळे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पीडित रक्ताच्या थारोळ्यातून तक्रार नोंदवायला येतात, मात्र पोलिसांना गुन्हेगारांचा थांगपत्ता लागत नाही की त्यांना जाणीवपूर्वक मोकळे रान दिले जात आहे, असा संतप्त सवाल जनता विचारत आहे.
या प्रकरणात सर्वात संतापजनक बाब म्हणजे, सामाजिक सलोखा उद्ध्वस्त करणाऱ्या या गुंडांना वाचवण्यासाठी राजकीय दबावतंत्र वापरले जात असल्याचे आरोप होत आहेत. “मी राज्याचा आदिवासी विकास मंत्री आहे, मी सगळं पाहून घेईन” असा थेट पाठींबा देत सत्तेच्या जोरावर या नराधमांना बळ दिले जात असल्याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची प्राथमिक जबाबदारी असलेले जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता हे देखील या गंभीर प्रकरणात केवळ वेळकाढूपणा करत असल्याचे दिसून येत आहे. पीडितांच्या जखमांवर फुंकर घालण्याऐवजी पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगारांना दिली जाणारी सूट ही अत्यंत लाजीरवाणी आहे.
🔥 ”दलित नेते आता काय करत आहेत?” — पीडितांची आर्त हाक
गावात खुलेआम अत्याचार होत असताना आणि एका दलित कुटुंबाचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न सुरू असताना यवतमाळ जिल्ह्यातील दलित नेते गप्प का बसले आहेत, असा संतप्त आणि हताश सवाल डोफे कुटुंबीयांनी विचारला आहे. निवडणुकीच्या वेळी मतांसाठी घराघरांत येणारे नेते आता कुठे लपले आहेत, असा जाब पीडित समाज विचारत आहे. खैरलांजीसारख्या अमानुष प्रकरणाची आठवण करून देणाऱ्या या घटनेतील मुख्य सूत्रधार सतीश मानलवार आणि त्याच्या ५४ गुंडांना तात्काळ बेड्या ठोकून गजाआड केले नाही, तर यवतमाळ जिल्ह्यात तीव्र जनआक्रोश उसळल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा आता नागरिकांमधून दिला जात आहे.(क्रमशः)