भाजपाला सोडचि्ठी देत अनेक कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश.

0

भाजपा कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या कार्याला प्रभावित होऊन भाजपा कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश..

हिंगणघाट : भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या कार्याला प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला पक्ष प्रवेश.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर श्रद्धा ठेवत अशोक डगवार यांच्या नेतृत्तवात प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या जेष्ठ कार्यकर्त्यांनी तसेच महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला.यावेळी दहेगाव(उजवणे) माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद बाभुळकर, गौतम लाडंगे, विनोद भुजाडे, स्वपिल आत्राम, अमर बावने, राजकुमार बाभुलकर , वनिता लाडंगे, वनिता सुरपान, पुनम थुल, विठ्ठल किन्हेकर, कवडू सुरपान, पराग बाभुलकर, अंकित तळवेकर,राजू बावणे, प्रज्वल बाभुलकर आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला. प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा दुप्पटा घालून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अशोक डगवार, अमोल बोरकर सुनिल भुते, पप्पू आष्टीकर, सुशील घोडे, राजू मुडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

ईकबाल पहेलवान सहासिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!