महिलेची हत्या करून पिशवीत बांधलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
साहसिक न्यूज24
फिरोज तडवी / यावल जळगाव:
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात एका महिलेची अतिशय पूर पद्धतीने हत्या करून मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून पुलावरून फेकण्यात आल्याने परिसर हादरला असून एकच खळबळ उडाली आहे
कुंड घोडसगाव पुलाजवळ मुक्ताईनगर ते बु-हाणपुर महामार्ग नॅशनल हायवे मार्गावर संत मुक्ताई साखर कारखान्याच्या पुढे असणाऱ्या पुलाच्या खालील बाजूस आज सकाळी एका स्री जातीच्या महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली अतिशय क्रूरपणे हत्या केल्यानंतर त्या महिलेचा मृतदेह हा जाळ प्लास्टिकच्या कॅरीबॅग मध्ये भरून इथे टाकण्यात आला असून डोक्याला जबर मार लागला आहे
संबंधित महिलेचीओळख पटली नसून तिचे वय साधारणपणे 40 ते 45 वर्षाच्या दरम्यान असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली पुलाच्या खालील बाजूस असलेले मृतदेह हा वर काढण्याचे प्रयत्न सुरू असून याप्रकरणी पोलिसांनी पंचनामाची प्रक्रिया सुरू केली आहे मृतदेह शेव विच्छेदन साठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे