मुक्ताईनगरात ३७ लाखांचा शस्त्रसाठा जप्त ; चौघांना अटक
Byसाहसिक न्यूज24
मुक्ताईनगर / पंकज तायडे:
चोपडा -शिरपूर रस्त्यावरील एस्सार कंपनीच्या पेट्रोल पंपाजवळ अवैद्य शस्त्र खरेदी विक्री करताना तब्बल चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून ६ गावठी बनावटीचे कट्टे, ३० जिवंत काडतूस, ४ मोबाईल फोन व फोर्ड एंडेवेअर कंपनीचे चार चाकी वाहन असा एकूण रु. ३७,३७००० किमंतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा ते शिरपुर रोडवर एस्सार पेट्रोलपंपाजवळ दिनाक 17 रोजी रात्री ९.३० वा. सुमारास आरोपी गणेश उर्फ सनी सुनिल शिंदे वय 25 रा. ओगलेवाडी ता. कराड जि.सातारा, मोहसीन हनिफ मुजावर वय 30 रा.युवराज पाटील चौक, मसुर ता.कराड जि. सातारा , रिजवान रज्जाक नदाफ वय 23 रा. शिवाजी चौक, मलकापुर ता. कराड. जि. सातारा व अक्षय दिलीप पाटील वय 28 रा. रविवार पेठ, कराड जि.सातारा या सर्वानी अवैद्य शस्त्र खरेदी विक्री करणारा आरोपी सुरज विष्णु सांळुखे रा.कराड जि.सातारा याचे सांगण्यावरुन आरोपी सागर सरदार (शिखलकर) रा. पारउमर्टी जि.बडवानी याच्या जवळून 6 गावठी बनावटीचे पिस्टल (कट्टा) मॅग्झीनसह तसेच 30 पिवळया धातुचे जिवंत काडतुस हे विनापरवाना व बेकायदेशीर रित्या स्वताच्या कब्ज्यात बाळगून कोणास तरी विक्री करण्याच्या उद्देशाने आढळून आल्याने चारही जणांना ताब्यात घेण्यात आले.