🔥हाच तो सट्टा किंग पिपरानी चा भाचा पोलिस शिपाई अंकुश फेडरर🔥हाच तो यवतमाळ येथील कुप्रसिद्ध सट्टा किंग निलेश पिपरणी ज्याने पोलिस ना मॅनेज करून धुव्वाधार जुवा केला सुरू
यवतमाळ प्रतिनिधी -/ आंतरराष्ट्रीय पातळीवर रंगणाऱ्या एकदिवसीय (वन डे) क्रिकेट सामन्यांच्या रणधुमाळीत यवतमाळ शहरासह संपूर्ण जिल्ह्यात एका भयंकर आणि जीवघेण्या सट्ट्याचा विळखा घट्ट होत चालला आहे. सट्टा माफिया निलेश पिपराणी याने शहरात क्रिकेट सट्ट्याचे अथांग साम्राज्य उभे केले असून, सामन्यांच्या प्रत्येक चेंडूवर लाखो-कोट्यवधींची उलाढाल सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या काळ्या धंद्याला कायदा-सुव्यवस्थेचे रक्षक मानल्या जाणाऱ्या पोलिसांचेच उघड पाठबळ लाभत आहे. पिपराणीचा सख्खा भाचा आणि स्वतः पोलीस दलात सेवेत असलेला अंकुश फेन्डर हाच या सट्टा सिंडिकेटचा मुख्य संरक्षक व सूत्रधार बनल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. रक्षकच भक्षक बनल्यामुळे यवतमाळात पिपराणीचे हे साम्राज्य कोणतीही भीती न बाळगता बेधडकपणे फोफावले आहे.क्रिकेटचा खेळ हा आज मनोरंजनापुरता उरलेला नसून, निलेश पिपराणीसारख्या बुकींनी त्याला लूटमारीचे खुले व्यासपीठ बनवले आहे. सध्या सुरू असलेल्या वन डे मालिका आणि सामन्यांच्या नावाखाली यवतमाळातील शेकडो नागरिकांना, विशेषतः तरुण पिढीला सट्ट्याची भयंकर लत लावण्यात आली आहे. पिपराणी हा क्रिकेट सट्टा खेळणाऱ्यांना विविध क्लब व वेबसाइट्सच्या गोपनीय ‘आयडी’ आणि पासवर्ड्सचे वाटप करतो. सुरुवातीला नफ्याचे आमिष दाखवून तरुणांना या दलदलीत ओढले जाते. एकदा का सट्ट्याचा नाद लागला की, सामन्याच्या निकालांमध्ये आणि सट्टा दरांच्या खेळात खेळाडू अडकतात. परिणामी, अनेकांची आयुष्यभराची जमापुंजी, कौटुंबिक बचत, दागिने आणि जमिनी थेट पिपराणीच्या घशात जात आहेत. अनेक कुटुंबे कर्जाच्या विळख्यात सापडून रस्त्यावर आली आहेत.
या काळ्या बाजाराची सर्वात संतापजनक बाजू म्हणजे खाकी वर्दीचा उघड वापर. निलेश पिपराणीचा भाचा अंकुश फेन्डर हा पोलीस विभागात कार्यरत असून, तो आपल्या अधिकारांचा आणि खाकी वर्दीच्या धाकाचा गैरवापर करून सट्टा रॅकेट सुरक्षित चालवण्याची पूर्ण हमी देतो. कोणत्याही स्थानिक पोलीस ठाण्याची रेड पडू नये, धाड पडण्यापूर्वीच निलेश पिपराणीला अलर्ट मिळावा आणि सट्ट्यात पैसे हरलेल्या लोकांकडून जबरदस्तीने वसुली करता यावी, यासाठी अंकुश फेन्डरची खाकी ढाल सक्रियपणे काम करत आहे. कायद्याचे रक्षण करण्याची शपथ घेतलेला कर्मचारीच जेव्हा सट्टा किंगच्या आर्थिक साम्राज्याचा मॅनेजर आणि संरक्षक बनतो, तेव्हा सामान्य नागरिकांनी दाद कोणाकडे मागावी, असा संतप्त सवाल यवतमाळकर विचारत आहेत.
या सट्टा सिंडिकेटमधून निलेश पिपराणीने अत्यंत कमी कालावधीत अमाप काळा पैसा गोळा केला आहे. सट्ट्यातून कमावलेल्या या पैशांच्या जोरावर शहरात गुन्हेगारी प्रवृत्तींना खतपाणी घातले जात आहे. आर्थिक विवंचनेत सापडलेले तरुण गुन्हेगारीकडे वळत असून, घरातून पैसे पळवणे, चोऱ्या करणे आणि आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या घटनांची भीती निर्माण झाली आहे. वन डे सामन्यांच्या प्रत्येक षटकावर सट्टा घेणारा पिपराणी आणि त्याला वर्दीची साथ देणारा फेन्डर यवतमाळच्या सामाजिक सुरक्षेला उघड सुरुंग लावत आहेत.
शहरात दिवसाढवळ्या चालणाऱ्या या क्रिकेट सट्ट्याबाबत आणि पोलीस कर्मचारी अंकुश फेन्डरच्या संशयास्पद भूमिकेबाबत शहरभर चर्चा रंगली आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने स्वतःच्याच विभागातील भ्रष्ट घटकांवर आणि निलेश पिपराणीवर कठोर मोक्का किंवा प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची वेळ आली आहे. पोलीस अधीक्षक या सिंडिकेटची मुळे उखडून फेकून खाकीवरील लागलेला हा डाग पुसणार की नेहमीप्रमाणे कागदी कारवायांचा फार्स करून या सट्टा माफियांना मोकळे रान देणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.(क्रमशः)