यशदाच्या ३२ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची वर्धा परिवहन

0

🔥यशदाच्या ३२ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची वर्धा परिवहन कार्यालयाला भेट!🔥रस्ता सुरक्षा आणि प्रशासकीय समन्वयाबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे यांचे मार्गदर्शन!

पुणे -/ येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी अर्थात ‘यशदा’च्या एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र दर्शन दौऱ्यावर असलेल्या ३२ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी आज वर्धा येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाला भेट दिली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे होत्या. या दौऱ्यात पोलीस उपअधीक्षक, सहायक राज्य कर आयुक्त, सहायक कामगार आयुक्त, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांच्यासह विविध संवर्गांतील वर्ग ‘अ’ अधिकाऱ्यांचा सहभाग होता.

सर्वप्रथम कार्यालयातील रस्ता सुरक्षा कक्षात अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर कार्यालयातील विविध विभागांची ओळख करून देत दैनंदिन कामकाजाची माहिती देण्यात आली.

यावेळी स्नेहा मेढे यांनी परिवहन विभागाचे कामकाज, रस्ता सुरक्षेचे महत्त्व आणि शासकीय कामकाजातील आंतरविभागीय समन्वयाबाबत मार्गदर्शन केले. तसेच प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

या कार्यक्रमाला यशदाचे प्राध्यापक अमोल बामिष्टे, योगेश कांबळे, परिविक्षाधीन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सौरव सातव, मोटार वाहन निरीक्षक नितीन उके, प्रफुल मेश्राम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय माळवे यांनी केले, तर सौरव सातव यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. 

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 पुणे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!