यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भिडी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी…

0

भिडी / स्थानिक भिडी येथील यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे दिनांक 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अरविंद राठोड यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रफुल कांबळे ,अजय वानखेडे इत्यादी मान्यवर मंचकावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्र व कार्या विषयी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच मान्यवरांनी सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्या विषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाचे संचालन सौ. निशा कापकर यांनी केले तर आभार भोयर मॅडम यांनी मानले.तसेच या कार्यक्रमाला पुंडलिक गुळघाने,निलेश लाभे,भास्कर वाघमोडे,सोपान जवादे यांनी सहकार्य केले.या प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

राजू वाटाणे साहसिक न्यूज /24 भिडी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!