यावल येथील महीला खून प्रकरणी जावेद पटेल याला पाच दिवसांची पोलीस कोठडी
साहसिक न्यूज24
यावल/ फिरोज तडवी:
यावल शहरांत भर दिवसा महिलेचा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याने मयत पत्नीचा पती खालिद जाकिर अहमद काझी वय 43 रां काझिपुरा, यांनी यावल पोलीसात दिलेल्या तक्रारीनुसार जावेद युनुस प्तेल, यांचे व माझ्या पत्नीचे तीन महिन्यापूर्वी भांडण झाले होते, त्याचं भांडणाचा राग मनात धरून 27 ऑगस्ट रोजी कुऱ्हाडीने वार करून खून केला जावेद पटेल यांच्या वर यावल पोलिसांत ,302 प्रमाने गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीसांनी जावेद पटेल याला न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती यांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे,