रत्नापूर येथे उत्साहात तान्हा पोळा साजरा

साहसिक न्यूज24
देवळी/ सागर झोरे :
शेतकर्यांचा अतिशय महत्त्वाचा सण बैलपोळा हा श्रावण अमावस्या व भाद्रपद अमावास्या या दोन अमावस्या बैलपोळा व तानापोळा म्हणून ओळखला जाते.बैलपोळा,तानापोळा ही या शेतकऱ्याची संस्कृती,पंरपरा आहे.नंदी किंवा नंदीबैल हा पोळ्याच्या दिवशी पूजनीय असतो.कारण शिवाचे वाहन नंदीबैल आहे.सोबतच शेतकर्यांच्या सोबत रात्रदिवस शेतात राबणारा शेतातील सगळी कामे करणाऱ्या मित्रांचा सण म्हणजे बैलपोळा व तान्हा पोळा देवळी तालुक्यातील रत्नापूर गावात ग्रामपंचायत सदस्य सुधीर बोबडे यांच्या सहकार्याने ताना पोळा साजरा करण्यात आला.
तान्हा पोळ्यात मुलाच्या मनात मोठा उत्साह असतो तान्हा पोळ्यात मुले आपल्या लाकडी किंवा मातीच्या बैलाला स्पर्धेच्या दृष्टीने सजवितात पोळ्यात आपला नंबर कसा येईल या करीता घरातील लहान मुलांपासून तर मोठेही यात सहभागी होतात त्या अनुरूप मुलांची वेशभूषा ही केली जाते शेतकरी राज्याचे जिवन कसे सुजलाम सुफलाम होईल असा व देशभक्तीचा संदेश देण्यात येतो,मुले पोळ्यात एका रांगेत बसतात असा हा तान्हा पोळा मोठ्या उत्साहाने दरवर्षी रत्नापूर येथे ताना पोळा उत्साहात साजरा करण्यात येतो.
लहान मुलांना आयोजका तर्फे आकर्षक बक्षिसे देण्यात आले यावेळी रत्नापूरचे ग्रामपंचायत सदस्य सुधीर बोबडे,किशोर मुडे,सुधीर शेंद्रे, संदीप शेंद्रे,गुणवंत खडसे,सुनील खडसे,यश आखूड,सुमित पंडित,अनु पंडित,शुभम नेहारे,आदी यावेळी उपस्थित होते तसेच परिसरातील नागरिक व महिला ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.