राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा भ्याड हल्ला सहन करणार नाही – रोहिणी खडसे

0

मुक्ताईनगर / पंकज तायडे :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर काही एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक करण्यात आली होती. असा भ्याड हल्ला राष्ट्रवादी काँग्रेस सहन करणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहिणी खडसे खेवलकर यांनी केले. मुक्ताईनगर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. संबंधित घटनेतील संशयित आरोपींना अटक करून कठोरात कठोर कारवाई करावी अश्या मागणीचे निवेदन पोलीस स्थानक आणि तहसील कार्यालयात देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!