लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार

0

साहसिक न्यूज24
मुक्ताईनगर /पंकज तायडे:
रावेर तालुक्यातील खिर्डी येथील चंदन मोतीराम चौधरी या व्यक्तीने , विवाहितेला तीच्या पतीला घटस्फोट द्यायला लावून तिला लग्नाचे आमिष दाखवून ३२ वर्षीय विवाहितेवर जळगाव, खिर्डी, शेगाव, व सावदा येथे शारीरिक संबंध प्रस्थापित केले व या विवाहितेला अंधारात ठेवून परस्पर लग्न करुन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.
पीडित महिलेचे लग्न झालेले असून तिला १० वर्षाचा मुलगा आहे.तिच्या पतीची प्रकृती बरी नसल्याने जळगाव शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे या विवाहितेची तेथे काम करणाऱ्या चंदन चौधरी शी ओळख झाली होती. दवाखान्यातून सुटी झाल्यावर पीडिता व पती दोघे त्यांच्या घरी गेले. तेथून पीडितेचा पती कुठे तरी अचानक निघून गेला. त्यामुळे ती तिच्या माहेरी आली.
या दरम्यान पीडित महिलेची चंदनशी ओळख वाढू लागली.व त्यांच्यात जवळीक निर्माण झाली, चांदनने पीडितेला मला नोकरी लागली की, मी तुझ्याशी लग्न करेल असे सांगून दवाखान्यात, जळगाव येथील पांडे चौकातील व्यसनमुक्ती केंद्र, रावेर तालुक्यातील खिर्डी,सावदा व शेगाव येथे सन २०१४ ते २०१६ या काळात वेळोवेळी शारीरीक संबंध ठेवले. २०१८ मध्ये चंदन याला मुंबईत बँकेत नोकरी लागली. यानंतर २०१८ मध्ये पीडितेचा पती घरी परत आल्यानंतर चंदनने पिडीतेला पतीशी घटस्फोट घ्यायला लावला. पीडितेने तिच्या पतीशी घटस्फोट घेतल्यावर चंदनने परस्पर लग्न करुन घेतले. अशी तक्रार पीडितेने बुधवारी जळगाव शहर पोलीस स्टेशनला दिल्याने चंदन मोतीराम चौधरी, रा. खिर्डी, ता. रावेर, याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!