यवतमाळ -/ वणी तालुक्यातील मोहदा येथील गट क्र. ८५ व ८६/१ मधील प्रकरणात पंचनाम्यात खोदकामाची नोंद झाल्याची स्पष्ट नोंद आहे मात्र वणी प्रशासनाच्या कारवाईला मात्र ब्रेक लागल्याचे दोन महिने दिसून आले.विशेष म्हणजे, संबंधित प्रकरणातील स्वंयघोषित नेता रमेश राजूरकर यांची भूमिका पाहता ‘खनिज आपल्याच बापाचे’ असल्यासारखा तोऱ्यात आहे. उत्खननासाठी परवानगीचा अर्ज केलेला असताना त्यापूर्वीच खोदकाम झाल्याची नोंद पंचनाम्यात असेल, तर या संपूर्ण प्रकाराची कायदेशीरता तपासण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र दोन महिने उलटूनही ETS मोजणी पुढे सरकत नसेल, तर तहसीलदार निखिल धुळधर यांनी थातुरमातुर कागद रंगवून खनिज चोरी करण्याचा उद्देश करणारा रमेश राजुरकर याला “निव्वळ या प्रकरणात वाचविण्याचा ” प्रयत्न स्पष्ट केला आणि दोन महिने कागदे कार्यालयातच रेंगाळू दिले, याचा अर्थ “अर्थपूर्ण संबंध” यासाठीच वणी तहसीलदार निखिल धूळधर यांनी असे प्रयत्न केले असावे असे जोरदार बोलल्या जात आहे. म्हणून हा प्रश्न थेट जिल्हा प्रशासनासमोर उभा आहे.
दुसरीकडे जिल्हा खनिकर्म विभाग नेमका कुठे आहे? पंचनामा झाला, खोदकामाची नोंद झाली, परवानगीचा अर्ज आहे; तरीही प्रत्यक्ष उत्खनन किती, खोली किती आणि गौण खनिजाचे प्रमाण किती, हे निश्चित करण्यासाठी आवश्यक ETS मोजणी झाली नसेल तर खनिकर्म अधिकारी संजीव जोशी यांच्या विभागाने आतापर्यंत झोपेचे सोंग का घेतले? हा सवाल आता संतप्तपणे विचारला जात आहे. शासनाचा महसूल आणि गौण खनिजाच्या नियमबद्ध वापराचा प्रश्न असताना विभागाने स्वतःहून जागेची तांत्रिक पाहणी केली का, मोजणीचे आदेश दिले का, अहवाल मागविला का आणि पुढील कारवाई प्रस्तावित केली का, याचा दिनांकवार हिशेब जनतेसमोर येणे आवश्यक आहे.
आता या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी ‘रट्टा’ बसविण्याची वेळ आली आहे, अशी जोरदार मागणी होऊ लागली आहे. वणी तहसीलदार निखिल धुळधर यांच्या कार्यालयाने पंचनाम्यानंतर कोणती कार्यवाही केली आणि जिल्हा खनिकर्म विभाग अधिकारी जोशी यांच्या विभागाने ETS मोजणीसह पुढील प्रक्रिया का रेंगाळू दिली, याची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे. रमेश राजूरकर यांना खनिज स्वतःच्या मालकीचे असल्यासारखा तोरा दाखविण्याचा अधिकार कोणत्या कागदपत्रातून मिळाला, आणि प्रशासनाला कारवाई थांबविण्याचा अधिकार कोणी दिला? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे कागदपत्रांसह समोर आली पाहिजेत. पंचनामा खरा असेल तर कारवाईझालीच पाहिजे; कारवाई झाली असेल तर तिची कागदपत्रे दाखविली पाहिजेत.मोहदा प्रकरणात आता कोणतीही अळीमिळी गुपचूडी वणी तहसीलदार निखिल धुरधर तसेच जिल्हा खणीकर्म विभागाकडून व्हायला नकोच अशी मागणी केली आहे.
🔥सब अधिकारी पोमाडिंगी करणारा रमेश राजुरकर के हाथ में क्या….?
या प्रकरणांमध्ये एवढा मोठा भयंकर प्रकार समोर आल्यानंतरही हा रमेश राजूरकर स्वतःला एक मोठा स्वयंघोषित पुढारी समजतो अशी बोंब आहे.आणि सब अधिकारी मेरे हाथ में… असेही बोलत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. असं जर असेल तर या स्वयंघोषित नेत्याला प्रशासनाचा रट्टा बसणे गरजेचे आहे.(क्रमशः)