वर्धा पोलीस स्टेशन शहर हद्दीतील कुख्यात गुन्हेगाराविरुध्द एम.पी. डी. ए. कायद्यान्वये कारवाई.
वर्धा:पोलीस स्टेशन वर्धा शहर हद्दीतील कुख्यात गुन्हेगार शेख आदील शेख ईस्त्राईल, वय २५ वर्ष, रा. स्टेशन फेल, वर्धा याचेविरुद्ध भारतीय दंड विधान, भारतीय हत्यार कायदा अन्वये त्याचेविरुध्द २०२३ पावेतो एकुण ९ गुन्हे पोलीस स्टेशन वर्धा शहर अभिलेखावर नोंद आहेत, ज्यामध्ये खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्र बाळगणे, गैरकदयाची मंडळी गोळा करुन जिवघेणा हल्ला, दरोडा टाकणे, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करुन शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे यासारखे गंभीर गुन्हे करण्याचे सवयीचा गुन्हेगार आहे. स्थानबध्द आदील शेख याने वर्धा पोलीस स्टेशन शहर हद्दीतील स्टेशन फैल वध परिसरात स्वतःची टोळी तयार करुन टोळी द्वारे प्रचंड दहशत निर्माण केलेली होती. मार्च २०२३ मध्ये पोलीस स्टेशन वर्धा शहर चे हद्दीतील स्टेशन फैल परिसरात दोन टोळी मध्ये गुन्हेगारीच्या वर्चस्वातून गोळीबार सुध्दा करण्यात आला होता. तेव्हा पासुन पोलीस स्टेशन वर्धा शहरात स्थानबध्दाची प्रचंड दहशत निर्माण केली होती, त्याचे गुन्हेगारी कृत्यांवर आळा बसावा तसेच परिसरातील सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहावी याकरीता त्याचेविरुध्द पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन वर्धा यांनी अत्यंत धोकादायक इसम म्हणुन महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हाथभट्टीवाले, आषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा २०१५) अन्वये स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्फतीने मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, वर्धा यांना सादर करण्यात आला होता. सदरहू प्रस्तावाची मा. जिल्हा दंडाधिकारी यांनी गांभीयाने दखल घेवून शेख आदील शेख ईस्त्राईल, वय २५ वर्ष, रा. स्टेशन फैल, वर्धा याचा दिनांक २८ ऑगष्ट २०२३ रोजी स्थानबध्द आदेश जारी करण्यात आला होता, तेव्हा पासून शेख आदील शेख इस्त्राईल हा मागील दोन महीन्यापासून आपली अटक चुकवून बाहेर जिल्हयात फरार होता. त्यास दिनांक १३.१०.२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेवुन त्यास नागपुर जिल्हा मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे स्थानबध्द करण्यात आले आहे. पुढे येणाऱ्या नवरात्र उत्सव तसेच ईतर सार्वजनीक सन उस्तवा निमीत्याने भविष्यात सुध्दा अशाच प्रकारच्या शरीराविरुध्दचे गुन्हे करणारे गुन्हेगार, दारुविक्रेते अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांविरुध्द कठोर प्रभावी कार्यवाही करण्याचे संकेत मा. जिल्हादंडाधिकारी, वर्धा व मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी दिलेले आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, पोउपनी / अमोल लगड, स्था.गु.शा. वर्धा, पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर, पो.स्टे. वर्धा शहर पोलीस अंमलदार गजानन लामसे, गोपाल बावनकर, यशवंत गोल्हर, अमोल आत्राम, स्था.गु.शा. वर्धा पोउनि / दिलीप तिजारे, पोशी दिपक जंगले पो.स्टे. वर्धा शहर यांनी केली..
अविनाश नागदेवे सहासिक न्यूज-24