वर्ध्याच्या भिवापूर येथे शेतकऱ्याची आत्महत्या; अतिवृष्टीने झाले शेतीपिकाचे नुकसान
Byसाहसिक न्यूज24
देवळी/ सागर झोरे:
वर्ध्यातील भिवापूर येथे अतिवृष्टीने झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीला शेतकरी पाहू शकला नाही.झालेले नुकसान मिळणाऱ्या मदतीने देखील भरून निघणारे नसल्याने भिवापूर च्या अजाबराव घोंगे या शेतकऱ्याने आपल्या घराच्या छतावर चढून स्वतःच गळफास लावून घेतलाय. शेतकऱ्याच्या या आत्महत्येमुळे जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली आहे.
वर्धा तसेच देवळी तालुक्यात सतत एक महिना अतिवृष्टी झाली. जे पीक पेरले होते ते सतत पाण्याखाली राहिले. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे हाल झाले आहे. शेतकरी अजाबराव घोंगे यांनी पीककर्ज घेऊन कपाशीची लागवड केली होती. त्यांच्याकडे तीन एकर शेती असून कुटुंबाजी जबाबदारी शेतीमधून मिळणाऱ्या पिकवरच अवलंबून होती. शुक्रवारी मध्यरात्री अजाबराव घोगे हा सत्तर वर्षिय शेतकरी घरावर चढला आणि सळाखीला दोर बांधून स्वतःच उडी घेत आत्महत्या केली आहे. अती पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक पूर्ण गेले, जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आणि गंभीर परस्तिती निर्माण झाली त्यामुळे शेतकऱ्याने स्वतःलाच संपविले आहे. दोन नातू, एक मुलगा, पत्नी, सून इतका मोठा परिवार आहे.