वर्ध्यातील आरफओ नी केली पत्रकारांच्या नावावर आरा मशीन मालकाकडून लाखोंची वसुली
प्रतिनिधी / वर्धा :
मागील एक वर्षा अगोदर वर्ध्यात वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून रुपेश खेडकर यांची नियुक्ती झाली. रुजू होताच अवैद्य मुरूम उत्खनन तसेच अवैध रेती माफिया कडून पैसा वसुली करण्याची मोहीम सुरू केली. रात्री बेरात्री अवैद्य मुरूम उत्खनना वर धाड टाकून त्या ठिकाणी सेटलमेंट करून लाखो रूपयांची माया गोळा केली. या अवैध कामासाठी त्यांच्याच विभागातील कर्मचाऱ्यांनी विरोध केला त्यामुळे आरएफओ खेडकर यांनी त्या कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठांकडे तक्रारी करून त्यांच्या बदल्या केल्या. आरएफओ रुपेश खेडकर यांच्या त्रासाला कंटाळून अखेर कर्मचाऱ्यांनी सामूहिक तक्रार वरिष्ठांकडे केली.. वरिष्ठांनी त्या तक्रारीची दखल घेऊन एक समिती गठीत करून रुपेश खेडकर यांची चौकशी सुरू केली. आरएफओ खेडकर या चौकशी समितीला न जुमानता दिवाळीच्या काळात पत्रकारांच्या नावावरती आरा मशीन,अवैध मुरूम उत्खनन माफिया, रेती माफिया यांच्याकडून लाखो रुपये गोळा करून स्वतःच्या खिशा गरम केला. हा सर्व प्रकार एका आरा मशीन मालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर साहसिक न्यूज 24 या वुत्त वाहिनीला सांगितला.. आता तरी या लाचखोर आरएफओ रुपेश खेडकर याच्यावर डीएफओ राकेश शेपट हे कारवाई करणार काय? की याला पांघरूण घालणार याकडे लक्ष लागले आहे.