🔥हेच ते रेती माफिया व जुगार चालकांना प्रोसाहन देणारे आर्णी चे डबल गेम खेळनारे ठानेदार निलेश सुरडकर.
🔥आर्णीत सिंघमगिरीचा केवळ मुखवटा; शहरात अवैध धंद्यांचा धुमाकूळ!
🔥ठाणेदार सुरुडकरांच्या आशीर्वादाने जुगार आणि मटक्याला उधाण;
🔥लाचखोर महसूल यंत्रनेशी संगणमत.
यवतमाळ,आर्णी -/ आर्णी शहरात सध्या कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वतःला ‘सिंघम’ म्हणवून घेणारे ठाणेदार निलेश सुरुडकर यांच्या नाकाखाली शहरात अवैध धंद्यांनी सीमा ओलांडली आहे. विशेषतः भाऊ, भैय्या ‘ सेठ’ यांसारख्या दलालांनी ठाणेदारांना हप्ते देऊन आपले साम्राज्य उभे केले असून, त्यांच्या वरदहस्ताने शहरातील मच्छी मार्केट आणि मटण मार्केटमध्ये वरली मटका आणि जुगार राजरोसपणे सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
🔥हप्तेखोरी आणि सेटिंगचे राजकारण.
मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, ‘भाऊ, भैय्या,सेठ’ हे इसम ठाणेदारांच्या जवळचे मानले जातात. हे पोलिसांना काही मदोतरी मार्फत ठराविक रक्कम (हप्ता) पोहोचवून आपले अवैध धंदे निर्धास्तपणे चालवत आहेत. काही काळ जुजबी कारवाईचा देखावा करून शहरातील चक्री बंद करण्यात आली असली, तरी पडद्यामागून वरली मटक्याचे आणि जुगाराचे मोठे व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत.
🔥पत्रकार व पुढाऱ्यांना हाताशी धरून ‘पीआर’ स्टंट
ठाणेदार सुरुडकर यांनी शहरातील दोन-तीन विशिष्ट पत्रकारांना आणि काही स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी धरले आहे. स्वतःची ‘सिंघम’ म्हणून इमेज तयार करण्यासाठी हे पत्रकार ठाणेदारांच्या गुणगानाच्या बातम्या छापतात, तर दुसरीकडे याच पत्रकारांना आणि पुढाऱ्यांना शहराबाहेर जुगार क्लब चालवण्याचा जणू ‘परवाना’च ठाणेदारांनी दिला असल्याचे चित्र आहे. स्वतःची वाह-वा करून घेण्याच्या नादात शहरातील मुख्य गुन्हेगारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
🔥महसूल आणि पोलिसांची हातमिळवणी.
केवळ जुगारच नाही, तर आर्णीत रेती तस्करीनेही टोक गाठले आहे. लाचखोर तहसीलदार आणि पोलीस प्रशासन यांच्यात असलेल्या आर्थिक संगनमतामुळे रेती तस्करांचे फावले आहे. प्रशासन या गंभीर प्रकारांकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
🔥आता तरी कारवाई होणार का?
सामान्य जनतेची लूट होत असताना प्रशासन मात्र भाऊ, भैय्या, सेठ ‘च्या दावणीला बांधले गेले आहे. या अवैध धंद्यांमुळे आर्णीचे नाव बदनाम होत असून, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन ठाणेदारांच्या कार्यपद्धतीची चौकशी करावी आणि चिलम फुकी गँगचा पर्दाफाश करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
🔥खळबळजनक वास्तव:
पोलीस स्टेशनमध्ये बसून स्वतःच्या बातम्या मॅनेज करणारे ठाणेदार प्रत्यक्षात मात्र गुन्हेगारांच्या खांद्याला खांदा लावून अवैध धंद्यांना खतपाणी घालत आहेत. आर्णीची जनता आता या भ्रष्ट कारभाराविरोधात आक्रमक झाली आहे.”(क्रमशः)