वर्ध्यातील पंधरवाड्यातील सेवा ठरतेय राजकीय हिताची
साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा :
सेवा पंधरवाड्यात देण्यात येणारी सेवा ही कुणासाठी असेच म्हणायची वेळ आता आली आहे. वर्ध्याच्या विकास भवन येथे आयोजित सेवा पंधरवाड्यात सर्वसामान्य नागरिकांपेक्षा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारीच अधिक दिसून येत आहे. नागरिकांच्या कामावर भर देण्यापेक्षा पदाधिकारांच्या लाभाच्या कामाकडे जास्त लक्ष दिले जात असल्याचे चित्र सेवा पंधर वाड्यात आहे. त्यामुळे पंधरवाड्यातील सेवा राजकीय हिताची असेच म्हणायची वेळ आली आहे.
सर्वसामान्य माणसे कामासाठी आले असताना विविध कागद पत्राचा अभाव असल्याचे उत्तर दिले जाते, तर कधी लॅपटॉप हँग होत असल्याचे कारण पुढे केले जात तर काहींना येथे ऑनलाइन सुविधांच नाही असे सांगितले जाते. याचा प्रत्यक्ष अनुभव युवा परिवर्तन की आवाज संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना आला आहे. त्यांनी याबाबत खंत देखील व्यक्त केली आहे. परंतु राजकीय पक्षांचा आणि आमदाराच्या जवळचा कार्यकर्ता पदाधिकारी असेल तर मात्र चुटकीसरशी कामे पूर्ण केली जातात. हा राजकीय दुजाभाव सर्व सामान्य माणसासाठी का? असाच प्रश्न विचारला जात आहे. अनेक नेत्यांची व पदाधिकाऱ्यांनी याच सेवा पंधरवाड्याचा फायदा घेत अधिकाऱ्यांना कामी लावत आपली न होणारी कामे करून हेण्याचा डाव च साध्य केला आहे. तर काहींनी कमिशन मिळणारी कामे सेवा पंधरवाड्यात करून घेतली आहे.