वर्ध्यात बांधकाम होत असलेल्या सेफ्टी टॅन्कमध्ये बुडून बालकाचा मृत्यू

0

Byसाहसिक न्यूज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
वर्धा शहरात आठ वर्षाच्या मुलाचा खेळताना सेफ्टी टॅंक मध्ये तोल गेल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गजानन परिसरात रविवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.
वर्ध्यातील गाजनन नगर येथे ज्ञानेश्वर मंदिर जवळ नेहमीप्रमाणे ओम रवींद्र देशपांडे वय आठ वर्ष हा सकाळी खेळायला गेला. येथीलच ज्ञानेश्वर मंदिराच्या पाठीमागे तो खेळत होतो. इतर मित्र देखील तेथे खेळत होते. त्याठिकाणी इंगोले यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. बांधकामा दरम्यान सेफ्टी टॅंक देखील बांधली गेली त्यामध्ये पाणी देखील भरलेले होते. ही सेफ्टी टॅंक उघडी होती . खेळता खेळता मुलगा ओम हा टँकजवळ गेला आणि तोल जाताच त्यात तो पडला. मुलगा टँक मध्ये पडताना त्याच्या मित्रांना दिसला. त्याच्या मित्रांनी आरडा ओरडा केला. नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली. नागरिक गोळा होईस्तोवर मुलगा मृत पावला होता. जमलेल्यानी घरामलकावर रोष व्यक्त केला. सदर घटनेची नोंद राम नगर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!