वर्ध्यात विज पडून बैलजोडी ठार ; आजी नातू थोडक्यात बचावले
Byसाहसिक न्युज 24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
वर्ध्यातील सुसुंद्रा शेतशिवारात आज शनिवार (दिनांक १८) रोजी दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाट पावसाच्या सरी कोसळल्या यात शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या बैलजोडी अचानक वीज कोसळली यात बैलजोडी जागीच ठार झाली तर काही अंतरावर असलेल्या झोपडीत आजी व नातू बसले होते त्यांना मात्र काहीच जाणवले नाही.शेतकरी राजकुमार सोनूले यांनी पेरणीसाठी काही दिवसांपूर्वी बैलजोडी एक लाखाचा विकत घेतली होती मात्र पेरणीच्या तोंडावरच वीज पडून बैलजोडी ठार झाल्याने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाले आहे.