वाहीतपूर येथे 40 वर्षीय इस्माची गळफास घेऊन आत्महत्त्या

0

प्रतिनिधी /पवनार:

सेलू तालुक्यातील वाहीतपूर येथे एका 40 वर्षीय इस्माने घरी कोणीच नसल्याचा फायदा घेऊन घरातच गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना आज सायंकाळी 5.30 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली आहे. या प्रकरणी सेलू पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार राजू समाधान मानकर हा मागील काही दिवसापासून आर्थिक विवंचणेत होता त्यामुळे त्याने आज घरी कोणीच नसल्याचा फायदा घेत त्याने स्वतःच्या घरी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा सम्पवली. त्याला 2 चिमुकल्या मुली सुद्धा आहे. घटनेच्या वेळेस त्याची अर्धांगणी ही शेतात कामाला गेल्याचे गावातील नागरिकांकडून सांगण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच सेलू येथील पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी आपल्या टीम सहित घटनास्थळी पोहचून घटनास्थळाची पाहणी केली व मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला असून राजू मानकर याच्या आत्महत्तेचे नेमके करणं काय हे अजूनही कळाले नसून याप्रकरणी सेलू पोलिसानी कलम 174 सि.आर.पी.सि नुसार आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सेलू पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!