वर्धा -/ स्थानिक राम नगर येथील सहकार भारतीचे नागपूर विभाग प्रमुख तसेच सेवानिवृत्त वर्धा नागरी सहकारी बँकचे शाखाधिकारी विनोद भीमनवार यांची महाराष्ट्र सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली आहे. शिर्डी येथे झालेल्या सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेशाचे चौदावे आदिवेषण 21 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर त कालावधीत पार पडले. सदर अधिवेशनात विनोद भीमनवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.भीमनवार यांची नियुक्ती झाल्या मुळे यांचे सहकार भारतीच वर्धा जिल्हा अध्यक्ष प्रशांत मुळे, महामंत्री श्याम खत्री, संघटन प्रमुख मनोज पाचखेडे, वर्धा फेडरेशन पतसंस्था अध्यक्ष सुधाकर घवघवे, श्रीकांत चाफले, भास्कर धोटे, नंदकिशोर शोभावत , विशाल खनगण, श्रीकांत दोड, मंजिरी देशकर, प्रदीप पांडे, यांनी अभिनंदन व्यक्त केले आहे.